Join us

विनय पाठक मराठीच्या प्रेमात

By admin | Updated: March 30, 2015 22:46 IST

अभिनेता विनय पाठक सध्या मराठीच्या प्रेमात पडले आहेत. ‘चिडिया’ या आगामी हिंदी चित्रपटात विनय मराठी माणसाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

अभिनेता विनय पाठक सध्या मराठीच्या प्रेमात पडले आहेत. ‘चिडिया’ या आगामी हिंदी चित्रपटात विनय मराठी माणसाच्या भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटात मुलांच्या काकाची भूमिका केली आहे. ही मराठी व्यक्तिरेखा असल्यामुळे मी मराठी बोलण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रीकरण संपेपर्यंत मला बऱ्यापैकी मराठी बोलता येईल, असा विश्वास विनयना वाटतो. पुण्यातील गुरुवार पेठेत प्रसिद्ध असलेल्या भागीरथी चाळीत चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे.