Join us

विन डिजेल येतोय भारतात!

By admin | Updated: January 6, 2017 05:12 IST

महान अ‍ॅक्शन हिरो विन डिजेल आणि ब्युटिफुल दीपिका पादुकोण यांचा थ्रीलिंग अ‍ॅक्शन असलेला ‘ट्रिपल एक्स: दी रिटर्न आॅफ जेंडर केज’ हा हॉलिवूडपट भारतात प्रदर्शनासाठी सज्ज आहे

महान अ‍ॅक्शन हिरो विन डिजेल आणि ब्युटिफुल दीपिका पादुकोण यांचा थ्रीलिंग अ‍ॅक्शन असलेला ‘ट्रिपल एक्स: दी रिटर्न आॅफ जेंडर केज’ हा हॉलिवूडपट भारतात प्रदर्शनासाठी सज्ज आहे. नव्या वर्षांत हा बहुप्रतिक्षीत अ‍ॅक्शन हॉलिवूडपट आपल्या सगळ्यांचे भेटीस येतो आहे. दिग्दर्शक डी.जे.करूसो यांचा ‘एक्स एक्स एक्स : द रिटर्न आॅफ जेंडर केज’ येत्या १४ जानेवारीला भारतीय चित्रपटगृहांत प्रदर्शित होतो आहे. त्यापूर्वी मुंबईत या हॉलिवूडपटाचे शानदार प्रीमिअर होणार आहे. तेही हॉलिवूडप्रेमींच्या गळ्यातील ताईत असलेल्या विन डिजेलच्या उपस्थितीत. होय, विन डिजेल या प्रीमिअरला हजेरी लावण्यासाठी लवकरच मुंबईत येतो आहे. यानंतर विन आणि दीपिका यांच्या उपस्थितीत ‘ट्रिपल एक्स: दी रिटर्न आॅफ जेंडर केज’चे ग्रँड प्रीमिअर होणार आहे. दीपिकाचा हा हॉलिवूड डेब्यू चित्रपट असून, ती यात सेरेना उंगरची भूमिका साकारत आहे. विन व दीपिका यांच्यासह डोनी येन, निना डोबे्रव्ह, रूबी रोज आणि सॅम्युअल एल.जॅक्सन हे हॉलिवूड स्टारही या चित्रपटात झळकणार आहेत. ‘एक्स एक्स एक्स : द रिटर्न आॅफ जेंडर केज’ हा सन २००२ मध्ये अलेल्या ‘एक्स एक्स एक्स’ आणि २००५ मध्ये आलेल्या ‘एक्स एक्स एक्स : स्टेट आॅफ द युनियन’चा सीक्वल आहे. यापूर्वीच्या दोन्ही हॉलिवूडपटांप्रमाणे यातही धमाकेदार आणि चित्तथरारक अ‍ॅक्शन दृश्यांची भरमार असणार आहे, हे सांगणे नकोच...!