मयूर करंबळीकरदिग्दर्शित ‘वज्र’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना एक रहस्यमय कथा पाहायला मिळणार आहे. तसेच, या चित्रपटात प्रेक्षकांना अभिनेत्री मानसी नाईकचा एक झक्कास मुजरादेखील पाहायला मिळेल. या चित्रपटात अभिनेता समर्थ बारी हा खलनायकाची भूमिका साकारताना पाहायला मिळतोय. त्याच्या या भूमिकेविषयी समर्थ सांगतो, ‘या भूमिकेला डार्क शेड होती; मात्र ती खूप नैसर्गिकपणे आणि सहजतेने करणं गरजेचं होतं त्यासाठी मी तसा प्रयत्न केला आहे. त्यामुळे माझा हा प्रयत्न प्रेक्षकांना रुपेरी पडद्यावर पाहायला मिळतोय. मीदेखील माझी ही भूमिका पाहण्यासाठी खूपच उत्सुक होतो. तसेच हा माझा पहिला चित्रपट आहे. या चित्रपटाच्या टीमबद्दल एवढंच सांगेन, की सर्वांचा उत्साह आणि कामाबद्दलचा प्रामाणिकपणा पाहता, मला या टीमबरोबर परत काम करायला नक्कीच आवडेल. त्याचप्रमाणे प्रोजेक्ट छोटा असो वा मोठा, माझ्यासाठी भूमिका महत्त्वाची आहे. मिळालेलं काम प्रामाणिकपणे केले, की भविष्याची काळजी करावी लागत नाही, हे सूत्र मी याआधीपण फॉलो केलंय आणि यापुढेही करत राहीन. म्हणून या गोष्टीचा फायदा मला भविष्यात नक्कीच होईल.’
‘वज्र’ चित्रपटात समर्थ साकारणार खलनायक
By admin | Updated: January 16, 2017 02:37 IST