Join us  

मिर्झापूरचा बबलूभैय्या होणार बाबा?; विक्रांत मेस्सीच्या पत्नीने दिली गुडन्यूज

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2023 10:57 AM

Vkrant massey: दीड वर्षांपूर्वी विक्रांतने शीतल ठाकूरसोबत लग्न केलं होतं. त्यानंतर या दोघांच्या आयुष्यात आता एका नव्या पाहुण्याची एन्ट्री होणार आहे.

सोशल मीडियावर तुफान गाजलेली वेबसीरिज म्हणजे मिर्झापूर. या सीरिजचं कथानक आणि त्यातील पात्र प्रेक्षकांमध्ये विशेष गाजले त्यामुळे ही सीरिज सध्या लोकप्रिय ठरत आहे. यामध्येच या सीरिजमध्ये अभिनेता विक्रांत मेस्सीने साकारलेली बबलू पंडीत ही भूमिका विशेष गाजली. बबलू भैय्या म्हणू गाजलेला विक्रांत मेस्सी लवकरच बाबा होणार आहे. नुकतीच ही माहिती समोर आली आहे.

दीड वर्षांपूर्वी विक्रांतने शीतल ठाकूरसोबत लग्न केलं होतं. त्यानंतर या दोघांच्या आयुष्यात आता एका नव्या पाहुण्याची एन्ट्री होणार आहे. काही दिवसांपूर्वी शीतलने रक्षाबंधनाचे काही फोटो शेअर केले होते. हे फोटो पाहून लोकांनी ती प्रेग्नंट असल्याचा अंदाज लावला आहे.  

ई टाइम्सच्या वृत्तानुसार, विक्रांत आणि शीतल लवकरच आई-बाबा होणार असून ते त्यांच्या बाळाच्या आगमनासाठी प्रचंड उत्सुक आहेत. सध्या तरी त्यांनी ही गोड बातमी स्वत: पुरतीच मर्यादित ठेवली आहे. त्यामुळे सध्या तरी याविषयी कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, येत्या काही दिवसांमध्ये ते लवकरच ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर करणार आहेत.

दरम्यान, विक्रांत कायम त्याचं वैयक्तिक आयुष्य खासगी ठेवतो. त्याला त्याच्या कुटुंबाविषयी फारसं बोलायला किंवा त्यांच्याविषयीची माहिती शेअर करायला आवडत नाही. विक्रांत आणि शीतल यांनी १८ फेब्रुवारी २०२२ मध्ये लग्न केलं. या जोडीने मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पाडला होता. विक्रांत लवकरच  '12 वी फेल', 'सेक्टर 36', आणि 'हसीन दिलरुबा 2' या सिनेमांमध्ये झळकणार आहे. 

टॅग्स :विक्रांत मेसीमिर्झापूर वेबसीरिजसेलिब्रिटीवेबसीरिज