ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 7 - बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमार सध्या त्याचा आगामी चित्रपट 'जॉली एलएलबी 2' च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अक्षय कुमार नोएडामधील अॅमिटी युनिव्हर्सिटीत पोहोचला. यावेळी त्याच्या चाहत्यांचा अक्षरक्ष: पूर आला होता. यावेळी अक्षय कुमारसोबत चित्रपटात प्रमुख भूमिका निभावणारी हुमा कुरेशीदेखील उपस्थित होती.
अक्षयने प्रमोशनदरम्यान चाहत्यांचं खूप मनोरंजन केलं. सर्वात जास्त मनोरंजन तर तेव्हा झालं तेव्हा जेव्हा अक्षय कुमारने आपलं फेव्हरेट गाणं 'चुरा के दिल मेरा' वर डान्स केला. यावेळी हुमा कुरेशीदेखील अक्षयसोबत थिरकताना दिसली. अक्षयने ट्विटरच्या माध्यमातून हा व्हिडीओ शेअर केला आहे. दोघांनी 'मैं खिलाडी तू अनाडी' गाण्यावर डान्स केला.
Met these bunch of cool student lawyers or should I say soon to be Jollys today