Join us

वरुण आलियाच्या ट्विटने प्रेरित?

By admin | Updated: May 15, 2015 22:20 IST

बॉलिवूड गॉसिप्समध्ये अधिक रुची असलेल्यांसाठी एक खुसखुशीत बातमी आहे. सोशल नेटवर्किंग साईट्सवर जोक्सच्या माध्यमातून

बॉलिवूड गॉसिप्समध्ये अधिक रुची असलेल्यांसाठी एक खुसखुशीत बातमी आहे. सोशल नेटवर्किंग साईट्सवर जोक्सच्या माध्यमातून अकलेचे तारे तोडणाऱ्या आलिया भटच्या ट्विटने वरुण धवन प्रेरित झाला आहे. ‘बॉम्बे व्हेलवेट’ हा रणबीर कपूर आणि अनुष्का शर्माचा चित्रपट येत्या शुक्रवारी प्रेक्षकांसाठी प्रदर्शित होणार आहे. मात्र सेलिब्रिटींना कोणताही चित्रपट याआधीच पाहण्याची संधी मिळते. सिनेमा पाहून झाल्यानंतर आलियाने ‘ब्युटिफुली चाओटिक’ असे ट्विट केले. यानेच प्रेरित होऊन की काय वरुणनेही ‘चाओटिकली ब्युटिफुल’ असे ट्विट केले आहे.