मराठी मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध नायिका वर्षा उसगावकर लवकरच प्रेक्षकांना एका मालिकेत पाहायला मिळणार आहे. ती अनहोनी, अलविदा डार्लिंग, तन्हा यासारख्या हिंदी मालिकांमध्ये झळकली आहे. पण, काही वर्षांपासून ती हिंदी मालिकांपासून दूर आहे. आता ती जमाई राजा या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. जमाई राजा या मालिकेत लवकरच दोन नवीन एंट्री होणार आहेत. वर्षा उसगावकर आणि नीलू कोहली या मालिकेत आता झळकणार आहेत. वर्षा या मालिकेत क्रितिका बुवाची तर नीलू क्रितिकाच्या सासूची भूमिका साकारणार आहे. 007नंतर मी कोणतीच हिंदी मालिका केली नाही. मी मालिकांमध्ये काम करावे, अशी माझ्या फॅन्सची नेहमीच इच्छा होती. मला भेटल्यावर माझे फॅन्स सतत याबद्दल विचारत असत. त्यामुळे ही मालिका मी माझ्या फॅन्ससाठी करत आहे. जमाई राजा ही खूपच प्रसिद्ध मालिका आहे. अशा प्रसिद्ध मालिकेचा मी भाग होत असल्याने मी खूपच खूष आहे. क्रितिका ही अतिशय प्रेमळ आहे. ती आपल्या भाच्याचा शोध घेऊन त्याला सगळ्या सुखसुविधा देण्याचा प्रयत्न करणार आहे. माझी ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आवडेल, अशी मला आशा आहे.
वर्षा उसगांवकर करणार छोट्या पडद्यावर कमबॅक
By admin | Updated: January 15, 2017 02:45 IST