Join us

‘तोळा तोळा’चं अनप्लग्ड व्हर्जन

By admin | Updated: September 2, 2015 00:23 IST

‘तू ही रे’ या आगामी चित्रपटातील सर्वच गाणी सिनेमा रिलीज होण्याआधीच सुपरहिट ठरली आहेत. त्यातही ‘तोळा तोळा’ हे गाणं सर्वाधिक लोकप्रिय झालं आहे.

‘तू ही रे’ या आगामी चित्रपटातील सर्वच गाणी सिनेमा रिलीज होण्याआधीच सुपरहिट ठरली आहेत. त्यातही ‘तोळा तोळा’ हे गाणं सर्वाधिक लोकप्रिय झालं आहे. यात खास बात म्हणजे या गाण्याचं अनप्लग्ड व्हर्जनही रिलीज करण्यात आलं आहे. ‘मैं तेनू समझावा की’ या आलिया भटने गायलेल्या गाण्याच्या पावलावर पाऊल टाकत अभिनेत्री सई ताम्हणकर आणि तेजस्विनी पंडितने ‘तोळा तोळा’चं अनप्लग्ड व्हर्जन गायले आहे. चित्रपटातील कलाकारांचे लूक्स आणि सिनेमातील गाणी आधीच सुपरहिट ठरली असताना आणि सिनेमा प्रदर्शित व्हायला तीनच दिवस उरले असताना या सिनेमातील ‘तोळा तोळा’ या गाण्याचं अभिनेत्रींच्या आवाजातील नवं रूप म्हणजे प्रेक्षक आणि चाहत्यांसाठी खास मेजवानीच ठरत आहे. हे गाणं गाऊन दोघींनीही चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे आणि शिवाय या गाण्याचा व्हिडीओही मस्त करण्यात आला आहे. त्यामुळे चित्रपटातील इतर गाण्यांप्रमाणेच ‘तोळा तोळा’चं अनप्लग्ड व्हर्जनही प्रेक्षकांची पसंती मिळवणार, हे वेगळं सांगायला नकोच.