Join us

‘वज्र’ ठरला कलाकारांसाठी अविस्मरणीय अनुभव

By admin | Updated: January 15, 2017 02:49 IST

मयूर करंबळीकर दिग्दर्शित वज्र हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची संपूर्ण टीमच नवीन आहे. त्यामुळे एका नवोदित कलाकारांचा अभिनय आणि कला प्रेक्षकांना या चित्रपटाच्या

मयूर करंबळीकर दिग्दर्शित वज्र हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची संपूर्ण टीमच नवीन आहे. त्यामुळे एका नवोदित कलाकारांचा अभिनय आणि कला प्रेक्षकांना या चित्रपटाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. या चित्रपटातून अभिनेत्री मानसी नाईक हिने खास आपल्या अंदाजात मुजरा सादर केला आहे. तसेच या चित्रपटात राहूल सोलापूरकर, उल्हास आढाव, मीरा पाथरकर, अभिनीत पंगे, समर्थ बारी या कलाकारांचा समावेश आहे. या चित्रपटाविषयी राहूल सोलापूरकर सांगतात, वज्र चत्रिपटात सर्वच तरुण मंडळी आहेत. तरुणांनी केलेल्या एक वेगळा प्रयत्नाला प्रेक्षकांनी योग्य तो प्रतिसाद द्यावा. वज्रच्या संपूर्ण टीमला पुढच्या सगळ्याच प्रोजेक्ट्ससाठी माझ्या मनापासून शुभेच्छा. मयूर करंबळीकर, दिनेश पवार, शार्विल जोशी आणि संपूर्ण टीम सोबत काम करताना मला सुद्धा माझ्या कॉलेजच्या दिवसांची आठवण झाली. दिग्दर्शकाने खूप चांगल्या प्रकारे, सोप्प्या भाषेत, सर्वच सीन समजावून सांगितल्याने कधीच कुठल्या गोष्टीची अडचण आली नाही. ज्युनिअर टीम कडून खूप काही शिकायला मिळाले.प्रत्येकाला मनापासून वज्र हा माझा सिनेमा पाहावा असे मला वाटते असल्याचे अभिनेता उल्हास पवार यांनी सांगितले.