Join us  

कसोटी जिंदगीमध्ये उदय टिकेकर साकारणार 'ही' भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2018 2:17 PM

हिंदी चित्रपटांतील गाजलेल्या भूमिका रंगविणारा ज्येष्ठ अभिनेता उदय टिकेकर हा आता ‘कसोटी जिंदगी की-2’मध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसेल

ठळक मुद्देउदय टिकेकर दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत अनुराग बसूच्या वडिलांची साकारणार आहे

‘स्टार प्लस’वर ‘कसोटी जिंदगी की-2’ या प्रेमकथेचे पुनरागमन होत आहे. ही बहुप्रतीक्षित मालिका तब्बल 18 वर्षांनी पुन्हा प्रसारित होणार असून तिला आता काळानुसार थोडा आधुनिकतेचा स्पर्श होणार आहे. या मुळ मालिकेतील व्यक्तिरेखा कायम राहणार असल्या तरी कथानकाला नवे वळण मिळणार आहे. टीव्हीवर लोकप्रिय असलेले अनेक कलाकार या नव्या आवृत्तीत भूमिका साकारणार असून ते कोण आहेत, हे जाणून घेण्याची आम्हाला फार उत्सुकता लागली आहे.

हिंदी चित्रपटांतील गाजलेल्या भूमिका रंगविणारा ज्येष्ठ अभिनेता उदय टिकेकर हा आता ‘कसोटी जिंदगी की-2’मध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसेल. आपल्या वैविध्यपूर्ण भूमिकांबद्दल प्रसिध्द असलेला उदय टिकेकर आता अनुराग बसूचे वडील मोलोय बसू यांची भूमिका साकारणार आहे. मूळ मालिकेत ही भूमिका दीपक काझीर यांनी साकारली होती. परंतु या दुसऱ्या आवृत्तीसाठी निर्माते काहीशा तरूण आणि नव्या दमाच्या कलाकारांच्या संचाच्या शोधात आहेत. अनुराग बसूच्या वडिलांच्या भूमिकेसाठी त्यांना उदय टिकेकर सुयोग्य वाटला.

‘कसोटी जिंदगी की’मध्ये अभिनेत्री श्वेता तिवारी हिने प्रेरणाची भूमिका साकारली होती तर सिजेन खान अनुरागच्या भूमिकेत दिसला होता. या दोन्ही भूमिका चाहत्यांनी अक्षरश: डोक्यावर घेतल्या होत्या. २००१ मध्ये आलेली ही मालिका तब्बल ९ वर्षं सुरू होती. या मालिकेचे हे नवे रूप देखील प्रेक्षकांना तितकेच आवडेल अशी या मालिकेच्या टीमला खात्री आहे. 

टॅग्स :उदय टिकेकर