Join us

टीव्ही सिरीयलचा निर्माता बनला अक्षय

By admin | Updated: July 17, 2014 03:44 IST

बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार लवकरच एका टीव्ही सिरीयलच्या निर्मितीत हात अजमावणार आहे.

बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार लवकरच एका टीव्ही सिरीयलच्या निर्मितीत हात अजमावणार आहे. ग्रेजिंट गोट पिक्चर्स या बॅनरखाली अक्षय जमाईराजा नावाच्या एका नव्या टीव्ही सिरीयलची निर्मिती करणार आहे. टीव्हीवर सास-बहू सिरीयल्सचे वर्चस्व असताना अक्षयची ही नवी मालिका जावयाच्या कथेवर आधारित असणार आहे. जावयाची भूमिका रवी दुबे निभावणार असून त्याच्या पत्नीच्या भूमिकेत निया शर्मा दिसणार आहे. मालिकेत आई आणि मुलीच्या नात्यातील कडवटपणा दाखवला जाईल. या नात्यातील तणाव दूर करण्याचा प्रयत्न रवी करताना दिसणार आहे. अंचित कौर आणि डेलनाज पॉलही मुख्य भूमिकेत दिसतील.