वज्र हा चित्रपट एका हिऱ्याभोवती फिरणाऱ्या रहस्य कथेवर आधारित आहे. जगातील सर्वांत महाग असणारा हा हिरा जगातील ५ धनाढ्य व्यक्तीच्या मालकीचा असतो. ५ पैकी एक व्यक्ती अचानक नाहीसा होतो, त्या व्यक्तीचे कुठलेच धागेदोरे मिळत नसल्याने या गोष्टीचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात येतो. सीबीआयमधील एक अत्यंत चतुर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचे गुन्हे सहज सोडवणारा भूषण याच्याकडे हा तपास सोपवला जातो. भूषणच्या कौशल्यपूर्ण तपासकार्याची आणि मनोरंजनाने भरगच्च अशी ही चित्रपटकथा आहे. सॅम हा देश विदेशात सहज वावरणारा आणि हिरे चोरणारा अत्यंत सराईत असा गुन्हेगार असतो. सॅम या हिऱ्याच्या चोरीसाठी प्रयत्नशील असतो. सॅम आणि सॅमचा लहान मुलगा हेसुद्धा आता नवीन पद्धतीने चोरी करू लागल्याने ते पोलिसांना गुंगारा देत असतात. भूषण आणि सीबीआयचे मुख्य अधिकारी हरदास यांच्या संशोधन कौशल्याने सॅम कसा जाळ्यात अडकतो, हे हॉलीवूडच्या चित्रीकरणाच्या पद्धतीने या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळेल. पॅरीस, जर्मनीमध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले आहे. परिपूर्ण मनोरंजनाचा खजिना प्रेक्षकांना या चित्रपटातून पाहायला मिळतोय.
वज्र एक रहस्यमय कथा
By admin | Updated: January 14, 2017 06:46 IST