Join us  

दोन आठवड्यांत ७ मराठी चित्रपट होणार प्रदर्शित

By admin | Published: July 19, 2015 4:12 AM

एकाच दिवशी दोन जबरदस्त स्टारकास्ट असलेले चित्रपट निर्मित न करण्याचा ‘टे्रंड’ हिंदीमध्ये जपला जात असला, तरी मराठी चित्रपटसृष्टीमध्ये याची हवा अजून लागलेली नाही.

एकाच दिवशी दोन जबरदस्त स्टारकास्ट असलेले चित्रपट निर्मित न करण्याचा ‘टे्रंड’ हिंदीमध्ये जपला जात असला, तरी मराठी चित्रपटसृष्टीमध्ये याची हवा अजून लागलेली नाही. म्हणूनच आठवड्याच्या अंतराने म्हणजे २४ ते ३१ जुलैदरम्यान तब्बल सात चित्रपट तीन आणि चार अशा टप्प्यात प्रदर्शित होत आहेत. पण यामुळे प्रेक्षक विभागला जाणार हे लॉजिक मात्र निर्माते का विचारात घेत नाहीत, हा प्रश्न आहे. २४ जुलैला ‘पन्हाळा’, ‘कॅरी आॅन मराठा’, ‘मनातल्या उन्हात’ आणि ‘वाजलेच पाहिजे - गेम की सिनेमा’ हे चित्रपट झळकणार आहेत, तर ३१ जुलैला ‘ओळख माय आयडेंटिटी’, ‘देऊळबंद’ आणि ‘जाणिवा’ यांची धडाकेबाज एन्ट्री होणार आहे.