Join us

बॉलिवूडमध्ये झळकण्याची घाई नाही...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2017 02:44 IST

बेइन्तेहा, दहलीज अशा अनेक हिंदी मालिकांतून अभिनेता हर्षद अरोरा याने आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. तो सध्या एका हिंदी मालिकेत डबलरोलची भूमिका साकारत आहे

बेइन्तेहा, दहलीज अशा अनेक हिंदी मालिकांतून अभिनेता हर्षद अरोरा याने आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. तो सध्या एका हिंदी मालिकेत डबलरोलची भूमिका साकारत आहे. असे असले तरी बॉलिवूड चित्रपटात झळकण्याची घाई नसल्याचे त्याचे म्हणणे आहे. त्याच्या या मालिकेतील भूमिकेविषयी त्याने ‘लोकमत सीएनएक्स’शी साधलेला मनमोकळा संवाद... सध्या तू मालिकेत डबलरोलची भूमिका साकारत आहे. तुझ्यासाठी डबलरोल करणे आव्हानात्मक वाटते का?मी या मालिकेत स्टंटदेखील केले आहेत. मला शारीरिक इजादेखील झाली आहे. हे स्टंट माझ्यासाठी खूप आव्हानात्मक होते. मात्र, यातूनच मी खूप काही शिकलो आहे. एन्जॉयदेखील केला आहे. कारण आव्हानात्मक काम करण्यातच खरी मजा असते. छोट्या पडद्याविषयी तुझे मत काय?आता सध्या टी.व्ही. हे खूपच मोठे माध्यम आहे. कारण जे लोक सिनेमागृहात जाऊन चित्रपट पाहू शकत नाहीत, ते लोक घरी बसून टी.व्ही. पाहतात. तसेच आता गावा-गावांतदेखील टी.व्ही. पोहोचले आहेत. तसेच वेबसिरीज जमाना आला असला तरी, टी.व्ही. हे माध्यम मागे पडणार नाही, असे मला वाटते.तू यापूर्वी ‘खतरों के खिलाडी’ हा रिअ‍ॅलिटी शो केला आहे. त्यामुळे रिअ‍ॅलिटी शोविषयी तुला काय वाटते?खतरों के खिलाडी हा माझा सर्वांत आवडता रिअ‍ॅलिटी शो आहे. आतापर्यंत सर्वात जास्त याच रिअ‍ॅलिटी शोने मला प्रभावित केले आहे. हा शो करताना मला खूपच मजा आली होती. त्याचबरोबर या शोच्या माध्यमातून एक चांगला आणि वेगळा अनुभव मिळाला.बिग बॉस या शोची आॅफर आली, तर तू स्वीकारणार का?मला वाटत नाही मी बिग बॉस या रिअ‍ॅलिटी शोसाठी फीट आहे. कारण माझी वैयक्तिक आणि प्रोफेशनल लाइफ पूर्णपणे वेगळी ठेवतो. तसेच माझी वैयक्तिक लाइफ रुपेरी पडद्यावर न आणण्याचा मी प्रयत्न करणार आहे. एक कलाकार म्हणून मी माझ्या अभिनयाचा ठसा रुपेरी पडद्यावर निर्माण करणार आहे. तू प्रेक्षकांना बॉलिवूडमध्ये कधी पाहायला मिळणार?बॉलिवूडमधून दोन ते तीन आॅफर मिळाल्या आहेत. ज्या आॅफर आल्या आहेत त्या मला योग्य वाटल्या नाहीत. त्यामुळे सध्या मी रुपेरी पडद्यावरच चांगला शो करण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच मला बॉलिवूडमध्ये झळकण्याची घाई नाही.