Join us  

२२ वर्षांनंतर गोध्रा कांडाचं सत्य उलगडणार! विक्रांत मेस्सीच्या 'द साबरमती रिपोर्ट'चा टिझर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2024 9:50 AM

गोध्रा कांडावर आधारीत 'द साबरमती रिपोर्ट'चा दमदार टिझर रिलीज करण्यात आलाय. या तारखेला सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून 'द साबरमती रिपोर्ट' सिनेमाची उत्सुकता होती. २००२ साली ग्रोधा कांडने सगळा देश हादरला. २७ फेब्रुवारी २००२ ला ही घटना घडली. आता २२ वर्षांनंतर गोध्रा कांडावर आधारीत 'द साबरमती रिपोर्ट' सिनेमाचा टिझर भेटीला आलाय. या टिझरमध्ये '१२ th फेल' अभिनेता विक्रांत मेस्सी प्रमुख भूमिकेत आहे. टिझरमध्ये विक्रांत न्यूज अँकरच्या भूमिकेत दिसतोय.

'द साबरमती रिपोर्ट'च्या टिझरमध्ये पाहायला मिळतं की, श्रबण कुमार हा एक न्यूज अँकर असतो. तो टीव्हीवर गोध्रा घटनेची बातमी ब्रेक करतो. त्याच्यासमोर असलेल्या टेलिप्रॉप्टरवर गोध्रामध्ये घडलेली घटना ही दुर्घटना आहे, असा उल्लेख असतो. पुढे श्रबण त्याच्या वरिष्ठांना ही दुर्घटना नाही.. असं ठामपणे सांगतो. आणि पुढे टिझरमध्ये गोध्रा आणि साबरमती एक्सप्रेसचे रिअल फुटेज दिसतात.

५९ निरागस माणसांनी गोध्रा एक्सप्रेसमध्ये आपला जीव गमावला त्यांना आदरांजली. २२ वर्षांपुर्वी ही घटना घडली.. अशा शब्दात 'द साबरमती रिपोर्ट'चा टिझर शेअर करण्यात आलाय. या सिनेमात विक्रांत मेस्सी प्रमुख भूमिकेत आहे. शिवाय राशी खन्ना, रिद्धी डोग्रा या अभिनेत्रीही प्रमुख भूमिकेत आहेत. एकता कपूरने या सिनेमाची निर्मिती केली असून रंजन चंडेल सिनेमाचे दिग्दर्शक आहेत. ३ मे २०२४ ला हा सिनेमा रिलीज होणार आहे.

टॅग्स :विक्रांत मेसीगुजरात