Join us  

'ज्या घरात राहिलो जिथे मालमत्तेचे वाद झाले, वडिलांच्या मृत्यूनंतर…', शरद केळकरचा धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2023 12:07 PM

Sharad Kelkar : शरद केळकर सिनेइंडस्ट्रीत गेल्या १९ वर्षांपासून कार्यरत आहे. मालिका, सिनेमा आता ओटीटी अशा सर्व माध्यमातून त्याने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

मराठी आणि हिंदी सिनेइंडस्ट्रीत आपल्या भारदस्त आवाजानं रसिकांचं मन जिंकणारा अभिनेता शरद केळकर (Sharad Kelkar). शरद केळकर सिनेइंडस्ट्रीत गेल्या १९ वर्षांपासून कार्यरत आहे. मालिका, सिनेमा आता ओटीटी अशा सर्व माध्यमातून त्याने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सुरुवातीला व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट म्हणून काम केले. छत्तीसगढमधील छोट्याशा गावात जन्मलेला शरद केळकर याचा सिनेइंडस्ट्रीपर्यंतचा प्रवास तसा सोपा नव्हता. शरद याने नुकतेच एका मुलाखतीत त्याच्या स्ट्रगलच्या आठवणी जाग्या केल्या आहेत.

अभिनेता शरद केळकर आता डबिंग आर्टिस्ट म्हणून नावारूपाला आलेला आहे. मात्र त्याचा हा प्रवास मुळीच सोपा नव्हता असे तो सांगतो. कारण लहानपणी तोतरे बोलण्यावरून त्याला न्यूनगंड होता. या स्ट्रगलबद्दल त्याने नुकताच एक खुलासा केला आहे. आदिपुरुष या चित्रपटातील प्रभासने साकारलेल्या भूमिकेसाठी शरद केळकर याने डबिंग आर्टिस्टचे काम केले. या आवाजासाठी त्याने खूप मेहनत घेतली असल्याचे तो सांगतो. श्वासोच्छवासावर योग्य पद्धतीने नियंत्रण ठेवून त्याने हा आवाज दिला. काही न्यूरोलॉजिकल स्टॅमर आहेत, त्यांच्या मते जड जीभ असली की असे घडते किंवा शारीरिक त्रुटी असतात त्यामुळे बोलताना गोंधळ उडतो आणि घाईघाईत तोतरे बोलायला लागतो. आवाजावर मेहनत घेताना त्याने इतर कलाकारांचे खूप निरीक्षण केले, त्यावर अभ्यास केला. मी १०० टक्के माझ्या कामाला दिले असले तरी मला त्या श्वासामधला फरक जाणवतो. अजूनही मी ते परिपूर्ण करू शकत नाही असे त्याने या मुलाखतीत सांगितले.

घरात मालमत्तेचे वाद झाले आणि...

शरद केळकर म्हणाला की, मी लहानाचा मोठा झालो तेव्हा अभिनयाशी माझा दूरदूरचा संबंध नव्हता. मी माझ्या कुटुंबासमवेत ग्वाल्हेरमधील आमच्या वडिलोपार्जित घरात वाढलो, ज्या घरात पुढे मालमत्तेचे वाद झाले आणि त्यानंतर मात्र वडिलांचे निधन झाले. त्यामुळे पुढे ते घर घरासारखे वाटले नाही. त्यामुळे अगदी सुरुवातीपासूनच, मी त्या दिवसाचे स्वप्न पाहत होतो जेव्हा आपण स्वतःचे घर घेऊ शकू. 

आईने मला एकट्याने वाढवले

माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर आईने मला एकट्याने वाढवले. मी जेव्हा अभिनय क्षेत्रात पदार्पण केले तेव्हा तिने आनंदाने मला पाठिंबा दिला. छोट्या शहरांमध्ये अशी मानसिकता आहे की इंजिनियर किंवा डॉक्टर बनलं तरच तुम्ही यशस्वी ठरता, परंतु मला ती मानसिकता बदलायची होती. माझ्या संघर्षातून, माझ्या चांगल्या वाईट दिवसांतून तिचा माझ्यावरचा विश्वास मी कधीच कमी होऊ दिला नाही. म्हणून जेव्हा मी मुंबईत माझे घर विकत घेतले , माझ्या स्वप्नांचे घर, तेव्हा तिने माझ्यासाठी केलेल्या सर्व गोष्टींचे चीज झाले असे मला वाटले, असे शरद केळकर म्हणाला.

टॅग्स :शरद केळकर