Join us  

‘तेव्हा वडिलांनी आयुष्यात पहिल्यांदा मिठी मारली, मिस इंडिया वर्ल्ड २०२३ची विजेती नंदिनी गुप्ताने जागवली आठवण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2023 8:14 AM

Miss India World 2023 Nandini Gupta: ‘माझे वडील शेतकरी तर आई गृहिणी आहे. तुमची पार्श्वभूमी काय याने फरक पडत नाही; पण तुम्ही काय बनता ते महत्त्वाचे आहे. माझ्या पार्श्वभूमीला बालपणातील स्वप्नाच्या आड येऊ दिले नाही,’ असे मिस इंडिया वर्ल्ड २०२३ या स्पर्धेची विजेती नंदिनी गुप्ता म्हणाली

नवी दिल्ली/मुंबई : ‘माझे वडील शेतकरी तर आई गृहिणी आहे. तुमची पार्श्वभूमी काय याने फरक पडत नाही; पण तुम्ही काय बनता ते महत्त्वाचे आहे. माझ्या पार्श्वभूमीला बालपणातील स्वप्नाच्या आड येऊ दिले नाही,’ असे मिस इंडिया वर्ल्ड २०२३ या स्पर्धेची विजेती नंदिनी गुप्ता म्हणाली.     शिक्षणाचे महत्त्व पटवून दिल्याचे श्रेय तिने वडिलांना दिले. माझ्या करिअरबद्दल वडिलांच्या मनातील असुरक्षितता समजल्यावर शिक्षण सोडून वडिलांना कधीही दुखावणार नाही असे ठरवले होते. ‘मिस राजस्थान’ ठरल्यानंतर वडिलांची विचारसरणी पूर्णपणे बदलली.  ‘माझ्या विजयानंतर आई रडली नाही; पण वडिलांनी आयुष्यात पहिल्यांदा मला मिठी मारली. त्यांना अभिमान वाटला आणि चेहऱ्यावरील आनंदाश्रू मी पाहिले’ असे ती म्हणाली. पुढील वर्षी युएईमध्ये होणाऱ्या ७१ व्या मिस वर्ल्ड स्पर्धेत ती भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.

टॅग्स :मिस इंडिया