Join us

युवागिरी मालिकेतून तरूणांना मिळणार लैगिंक शिक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2016 17:18 IST

सध्या लहान मुलांना शाळेतूनच लैंगिक शिक्षण मिळाले पाहिजे याची चर्चा मध्यंतरी रंगली होती. तसेच याबाबतीत मोठया प्रमाणात जनजागृती करण्याचे ...

सध्या लहान मुलांना शाळेतूनच लैंगिक शिक्षण मिळाले पाहिजे याची चर्चा मध्यंतरी रंगली होती. तसेच याबाबतीत मोठया प्रमाणात जनजागृती करण्याचे कामदेखील विविध सामाजिक संस्था करत असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच इंटरनेटच्या काळात या शिक्षणाचे महत्व अधिक वाटू लागले आहे. त्यामुळे या लैगिंक शिक्षणाचे महत्व लक्षात घेता आता युवागिरी ही मालिका तरूणांपर्यत लैगिंक शिक्षणाचे महत्व पोहचविणार आहे. तरुण प्रौढ जे नुकतेच यौवनावस्थेतून गेले आहेत, अशांना शरीरातील इंद्रिये व त्यांच्या पुनरोत्पादन क्षमतेविषयी ज्ञान असणे गरजेचे असते. या वयात लैगिक शिक्षण हे फक्त पयार्यी शिक्षणाचा भाग नसून त्याचे ज्ञान असणे किशोरांसाठी आवश्यक असते. त्यांना या वयात नातेसंबंधांविषयी व सुरक्षित संभोगाविषयी माहिती असणेही आवश्यक असते. जेणे करुन प्रसंग ओढावल्यास आपले वर्तन कसे असावे याची जाणीव त्यांना होईल. म्हणूनच झी युवा या वाहिनीवर युवागिरी ही मालिका सुरू करण्यात आली आहे. या मालिकेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचेदेखील पाहायला मिळत आहे.  या कार्यक्रमाची सूत्रसंचालन करणारी जोडगोळी अपूर्व रांजणेकर आणि स्नेहा प्रधान हे आहेत. हे दोघे सध्या विविध महाविद्यालयात जाऊन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विविध प्रश्नोत्तराच्या मार्गाने लैंगिक शिक्षणाचे महत्व सांगत आहेत. विद्यार्थ्यांना प्रत्येक गोष्ट ही गंभीरपणाने न सांगता, हसत खेळत सुद्धा महत्वपूर्ण गोष्टी आजच्या युवापिढीला आपण समजवू नक्कीच शकतो. यासाठी झी युवाची युवागिरी ही मालिका हे उत्तम माध्यम आहे. युवागिरीवर युवांसाठी अशा अनेक वैविध्यपूर्ण गोष्टी दाखवल्या जातात. हा कार्यक्रम नक्कीच मुलांच्या ज्ञानात भर टाकणारा असणार आहे.