Join us  

Wow! हाच आहे का Hina Khan चा कोमोलिका लूक, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2018 3:30 PM

नव्या रुपात आणि नव्या ढंगात ही मालिका रसिकांच्या भेटीला येत असताना 9 वर्षांपूर्वी 'कसौटी जिंदगी की' मालिकेच्या आठवणीत रसिक रमताना दिसत आहे.

 2 ऑक्टोबर हा दिवस हिना खानसाठी खूप खास आहे. कारण या दिवशी तिचा वाढदिवस असतो. त्यामुळे सोशल मीडियावर तिच्या प्रत्येक अंदाजातील फोटोंना रसिकांची पसंती मिळते. तिच्या वेगवेगळ्या अंदाजातील फोटोंना सोशल मीडियावर खूप सारे लाईक्स आणि कमेंटस मिळत असतात. आता पुन्हा एक हिनाचा फोटो समोर आला आहे. खुद्द हिनानेच हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत तिचा बंगाली लूक पाहायला मिळतो आहे. कपाळावर लाल रंगाची मोठी टिकली आणि गळ्यात मोठा हार असा श्रृंगारामुळे हिनाच्या सौंदर्याला चारचाँद लागल्याचे पाहायला मिळत आहे. या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटसचा वर्षाव होत असल्याचे पाहायला मिळत आहे. 

तर दुसरीकडे 'कसौटी जिंदगी की 2'मालिकेत हिना कोमोलिका बनत पुन्हा छोट्या पडद्यावर एंट्री मारणार आहे. त्यामुळे मालिकेतील कोमोलिका रूपातला हा हिना खानचा फोटो असल्याचे बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वीच या मालिकेचा एक प्रोमो रिलीज करण्यात आला होता. या प्रोमोत तिचा पाठमोरा लूक पाहायला मिळाला होता. पहिल्यांदाच बंगाली रूपातला हा हिनाचा फोटो समोर आल्यामुळे हिनाचा कोमोलिका लूक असल्याच्या चर्चा आहेत.  

ये रिश्ता क्या कहलाता है मालिकेनं नवा रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे. 12 जानेवरी 2009 पासून सुरु झालेली ही मालिका गेल्या 9 वर्षांपासून ही मालिका रसिकांचं अविरत मनोरंजन करत आहे. याच मालिकेत हिना खानने अक्षरा बहू बनत रसिकांची मनं जिंकली होती.एकाच मालिकेत तिने 8 वर्ष काम केले.त्यानंतर तिने या मालिकेतून एक्झिट घेत 'खतरों के खिलाडी सिझन 8' आणि त्यानंतर 'बिग बॉस सिझन 11'मध्ये झळकली होती. रिअॅलिटी शोमध्ये झळकल्यानंतर आता ती पुन्हा डेली सोपकडे वळली असून कोमोलिका या भूमिकेला ती कितपत न्याय देऊ शकते हे ही पाहणे रंजक ठरणार आहे.

श्वेता तिवारीने साकारलेली प्रेरणा ही भूमिका  ऐरिका फर्नांडिस साकारणार असून अनुरागच्या भूमिकेत पार्थ समंथन झळकणार आहे. नव्या रुपात आणि नव्या ढंगात ही मालिका रसिकांच्या भेटीला येत असताना 9 वर्षांपूर्वी 'कसौटी जिंदगी की' मालिकेच्या आठवणीत रसिक रमताना दिसत आहे.

टॅग्स :हिना खानकसौटी जिंदगी की 2