Join us  

‘जेडी’ चित्रपटाचा जागतिक टीव्ही प्रीमिअर!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2018 10:35 AM

तलवारीपेक्षा लेखणीची ताकद अधिक असते, असे म्हटले जाते. पण कोणी तुमच्याच लेखणीचा वापर तुमचे नशीब पुसून टाकण्यासाठी केला, तर? ...

तलवारीपेक्षा लेखणीची ताकद अधिक असते, असे म्हटले जाते. पण कोणी तुमच्याच लेखणीचा वापर तुमचे नशीब पुसून टाकण्यासाठी केला, तर? सत्ता आली की केवळ जबाबदारीच येते असे नव्हे, तर शत्रूही येतात. एका महिला पत्रकारावर हल्ला केल्याच्या आरोपावरून एका संपादकाला अटक केली जाते, अशी जेडी या चित्रपटाची कथा असून ती एका सत्य घटनेवर आधारित आहे. सत्यशोधनाच्या कामात पत्रकारांना कोणत्या आव्हानांना नेहमी सामोरे जावे लागते, हे या चित्रपटातून दाखवून देण्यात आले आहे. शैलेंद्र पांडे हेच निर्माते व दिग्दर्शक असलेल्या या चित्रपटात ललित बिश्त आणि वेदिका प्रताप सिंह हे प्रमुख भूमिकेत आहेत. तसेच अमन वर्मा आणि गोविंद नामदेव हेही महत्त्वाच्या भूमिकेत दिसतील.नए इंडिया का ब्लॉकबस्टर मूव्ही चॅनल असलेल्या अ‍ॅण्ड पिक्चर्सवर शुक्रवार, 11 मे रोजी रात्री 10.00 वाजता या चित्रपटाचे प्रसारण केले जाईल.अमेरिकेतून पत्रकारितेचे शिक्षण घेऊन आलेला जय द्विवेदी ऊर्फ जेडी (ललित बिश्त) लखनौतील एका छोट्या वृत्तपत्रात नोकरी स्वीकारतो, पण अंतिमत: दिल्लीत जाऊन पत्रकारितेत काही मोठे काम करण्याचे त्याचे ध्येय असते. नोकरीच्या पहिल्याच दिवशी त्याच्या स्वत:च्या नावाने एक बातमी त्या वृत्तपत्रात प्रसिध्द होते. राजकीय क्षेत्रात एक नेता असलेले आपले काका दिवाकर वर्मा (गोविंद नामदेव) यांच्या मदतीने जेडी लवकरच पत्रकारितेच्या क्षेत्रात यशाच्या पायर-या चढतो आणि लवकरच दिल्लीत ‘जेडी’ या नावाचे स्वत:चे मासिक सुरू करतो. या मासिकाची संपादिका नूर (वेदिका प्रताप सिंह) ही या मासिकाच्या प्रशासनावर आपली पकड बसविते आणि एका परीने जेडीलाही आपल्या अंकित करून घेते. शेवटी एका महिला पत्रकाराशी गैरवर्तन केल्याचा आरोप जेडीवर ठेवला जातो आणि जेडी आपल्या वकिलाच्या (अमन वर्मा) मदतीने स्वत:ची सुटका करून घेण्यासाठी संघर्ष करतो.