Join us

संदिपने का घातला स्विमसूट?जाणून घ्या कोणासाठी घातलाय त्याने हा स्विमसूट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2016 11:40 IST

कालाकार नेहमी साकारत असेलेल्या भूमिकेसाठी नाविण्य आणण्याचा प्रयत्न करत असतात.त्यासाठी कधी ते मेकओ्वहर करतात तर कधी वेशभूषा बदलतात. तोच ...

कालाकार नेहमी साकारत असेलेल्या भूमिकेसाठी नाविण्य आणण्याचा प्रयत्न करत असतात.त्यासाठी कधी ते मेकओ्वहर करतात तर कधी वेशभूषा बदलतात. तोच तो पणा मालिकेत येवू नये म्हणून मालिकेची टीमही यासाठी प्रयत्नशील असते. असाच काहीसा प्रयोग तुम्हाला ‘मे आय कम इन, मॅडम?’  पाहायला मिळणार आहे. नेहमीप्रमाणे हा प्रयोग होणार आहे.संदीप आनंदवरच.होय. संदीपने या मालिकेत आतापर्यंत किती विविध रूपे घेतली असतील, त्याची गणना करणेही त्याने आता सोडून दिले आहे. आता आणखी एका आगामी विनोदी भागात संदीप चक्क महिलांचा स्विमसूट घालणार आहे! शांताबाई ही घरकामवाली बाई ते गर्भवती महिला यासारखी अनेक प्रकारची रूपे त्याने लीलया साकारली होती. आपल्या अप्रतिम अभिनयगुणांनी त्याने प्रेक्षकांना थक्क केले आहे. आता आणखी एका विचित्र भागात तो चक्क महिलांचा स्विमसूट घालणार आहे. काही भागांपूर्वी मालिकेची नायिका नेहा पेंडसे हिने बिकिनी घालण्यास नकार दिला होता.आता आगामी भागात साजनची (संदीप आनंद) बॉस संजना (नेहा पेंडसे) त्याला स्विमसूटमध्ये बघण्याची इच्छा व्यक्त करते. तेव्हा साजन  स्विमसूटमध्ये पोहोण्याच्या तलावात संजनाबरोबर खेळत असल्याचे स्वप्न पाहू लागतो.संदीपने प्रथमच स्विमसूट घातला आहे, तेव्हाच्या त्याच्या अनुभवाविषयी त्याला विचारले असता, संदीप म्हणाला, “मी आता या क्षेत्रात पुष्कळ वर्षं असल्याने माझ्या चाहत्यांना काय बघायला आवडते, हे मला चांगलंच ठाऊक आहे. एक कलाकार म्हणून मी साजन अगरवालच्या भूमिकेतून त्यांना खुश ठेवण्यासाठी शक्य ते सारं काही करतो. बायकांचा स्विमसूट घालणं हे माझ्यापुढे आव्हान होतं, हे खरं; परंतु मी माझ्या प्रेक्षकांना आतापर्यंत विचित्र भूमिका अचूकतेने सादर करून सतत समाधानी ठेवलं आहे.”त्यामुळे स्विमसुट घालणेही अतर टास्कप्रमाणे ते हे स्विकारले. प्रेक्षकांना नेहमीप्रमाणे माझ्याकडून विविध गोष्टीतून मनोरंजन व्हावे हाच उद्देश इतर कलाकराप्रमाणे माझाही आहे. यापुढेही या मालिकेत असेच वेगवेगळे बदल होतील जे रसिकांनाही आवडतील अशी आशा वाटत असल्याचे संदिपने सांगितले.