ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेत नक्षच्या आयुष्यातून तारा गेल्याची आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे. पण नक्षच्या आयुष्यात आता एक नवी मुलगी येणार आहे. सतरंगी ससुराल या मालिकेत झळकलेली वीणा जगतापची या मालिकेत लवकरच एंट्री होणार असल्याची चर्चा आहे. वीणा ही नक्षपेक्षा वयाने मोठी असून तिचे लग्न झालेले आहे आणि तिच्या वैवाहिक आयुष्यात अनेक समस्या आहेत असे दाखवण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. सध्या मालिकेची क्रिएटिव्ह टिम या कथेवर काम करत असल्याचे म्हटले जात आहे
नक्षच्या आयुष्यातील ही कोण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2016 15:18 IST