Join us

​ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेतील मोहसिन खान बनला गायक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2017 16:57 IST

ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेच्या कथानकाला सध्या एक वेगळेच वळण मिळाले आहे. या मालिकेत प्रेक्षकांना लवकरच कार्तिक ...

ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेच्या कथानकाला सध्या एक वेगळेच वळण मिळाले आहे. या मालिकेत प्रेक्षकांना लवकरच कार्तिक आणि नायराचे लग्न पाहायला मिळणार आहे. त्यांच्या साखरपुड्याच्या भागाचे चित्रीकरणदेखील नुकतेच करण्यात आले. या भागाचे चित्रीकरण करण्यासाठी कार्तिकची भूमिका साकारणारा मोहसिन खान आणि नायराची भूमिका साकारणारी शिवांगी खूपच उत्सुक होते. मोहसिन हा त्याच्या खऱ्या आयुष्यात अतिशय शांत आणि अबोल आहे. मालिकेच्या सेटवर तो नेहमीच शांत बसलेला असतो. पण नुकताच त्याने मालिकेच्या सेटवर सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला. मोहसिनला हिंदी चित्रपट पाहायला खूप आवडतात. ए दिल मुश्किल या चित्रपटातील चन्ना मेरेया हे गाणे तर त्याला खूप आवडते. कार्तिक आणि नायराच्या साखरपुड्याच्या दृश्याचे चित्रीकरण सुरू असताना मोहसिन दोन दृश्यांच्या मध्ये मिळणाऱ्या ब्रेकमध्ये चन्ना मेरेया हे गाणे गुणगुणत होता. याविषयी मोहसिन सांगतो, "मी खरे तर बाथरूम सिंगर आहे. मी कधीच कोणाच्यासमोर गात नाही. पण त्या दिवशी मला काय झाले होते ते मलाच कळले नाही. मला गाणे गाण्याची लहर आली होती. कार्तिक आणि नायराच्या लग्नाचे दृश्य आम्ही चित्रीत करत असताना काही वेळांचा ब्रेक होता, तेव्हा मी दिग्दर्शकांकडून माइक घेतला आणि माइकवर चन्ना मेरेया हे गाणे गायलो. माझे हे रूप पाहून सेटवरील सगळ्यांनाच चांगलाच धक्का बसला होता. त्यांना सगळ्यांनाच माझे गाणे खूप आवडले. आता तर मालिकेच्या सेटवर सगळे मला नवनवीन गाण्याची फर्माइशच करत आहेत. त्यामुळे मी आता खूप स्पेशल असल्याचे मला वाटायला लागले आहे."