Join us

चक्क! 'बहू हमारी रजनीकान्त' मालिकेत तन्वी ठक्करने साकारला ‘50 शेडस ऑफ ग्रे’मधील प्रसंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2017 17:00 IST

अनेकदा मालिकेत काही भागाचे चित्रिकरण हे एका सिनेमातील प्रसंगाशी प्रेरित असल्याचे आपण पाहिले आहे.सिनेमात एखादा डायलॉग किंवा प्रसंग रसिकांच्या ...

अनेकदा मालिकेत काही भागाचे चित्रिकरण हे एका सिनेमातील प्रसंगाशी प्रेरित असल्याचे आपण पाहिले आहे.सिनेमात एखादा डायलॉग किंवा प्रसंग रसिकांच्या मनात घर करून असतो. त्यामुळे हा प्रयोग अनेक मालिकांमध्ये केला जातो.तसाच काहीसा प्रयोग बहु हमारी रनजीकान्त मालिकेत करण्यात आला आहे.‘50 शेडस ऑफ ग्रे’ चित्रपटातील सर्वाधिक गाजलेला प्रसंग, ज्यात ख्रिस्तियन ग्रे अनास्ताशियाला पलंगाला बांधतो,तोच प्रसंग ‘लाईफ ओके’वरील ‘बहू हमारी रजनी-कान्त’ या सर्वाधिक लोकप्रिय विनोदी मालिकेत चित्रित करण्यात आला आहे.फरक इतकाच असेल की या मालिकेत हा प्रसंग विनोदी पध्दतीने साकारला गेला आहे.मालिकेच्या आगामी भागात शर्मिलाची भूमिका साकारणारी अभिनेत्री तन्वी ठक्कर हिला पलंगाला साखळ्यांनी बांधण्या येते.ती सकाळी जागी होते,तेव्हा तिला आपण बांधले गेल्याचे जाणवते. तिला वाटते, आपल्या पतीनेच आपल्याला बांधले आहे.परंतु तिला नंतर कळते की रजनीनेच तिला बांधले आहे.या प्रसंगाबाबत तन्वीला विचारले असता,ती म्हणाली, “मला निर्मात्यांनी या प्रसंगाबद्दल सांगितल्यावर पहिल्या प्रथम माझ्या मनात ‘50 शेडस ऑफ ग्रे’ चित्रपटातला हाच प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिला,ज्यात ख्रिस्तियन ग्रे अनास्ताशियाला पलंगाला बांधतो. पण ‘रजनी-कान्त’ मालिकेत तो कामुक प्रसंग नसून विनोदी पध्दतीने उभा करण्यात आला आहे.किंबहुना आम्हाला या प्रसंगाचं चित्रीकरण करण्यास बराच वेळ लागला कारण बरेचदा मला हसू अनावर होत होतं.” जेव्हा आम्हाला या शूट विषयी सांगण्यात आले तेव्हा आम्ही खूप उत्सुक होतो. त्यामुळे ठरल्यानंसार हा प्रसंग चित्रित करण्यात आला.हा प्रसंग कॉपी करण्यात आला नसून प्रेरित झालेला आहे असंही तन्वीने सांगितले.