Join us

स्वॅग से स्वागत निम्कीच्या हळदीला सर्वांनी घातले पिवळे गॉगल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2018 13:38 IST

अखेर तो दिवस उजाडला आहे, जेव्हा निम्कीचे लग्न करण्याचे लहानपणचे स्वप्न पूर्ण होत आहे. निमकीचे लग्न असा धारण आणि ...

अखेर तो दिवस उजाडला आहे, जेव्हा निम्कीचे लग्न करण्याचे लहानपणचे स्वप्न पूर्ण होत आहे. निमकीचे लग्न असा धारण आणि रंगीबेरंगी तर असणारच. त्यामुळे प्रेक्षकांना स्टार भारतवरील शो निम्की मुखियामध्ये अतिशय अजब लग्न पाहायला मिळेल.निमकीच्या स्टाईलला असून निर्मात्यांनी ह्या सोहळ्‌यामध्ये काही मस्त गोष्टींचा समावेश केला आहे. निमकीचा हळदी सोहळा कलर-कोऑर्डिनेटेड असेल. एवढेच नाही तर हळदीला आलेले सगळेच पिवळे गॉगल्स परिधान करून ह्या सोहळ्‌यात ‘स्वॅग’ची भर टाकतील. ह्या सगळ्‌या गोष्टींमुळे सेटवर खऱ्याच लग्नासारखे वातावरण होते। सेटवरील क्रुनेसुद्धा हळदीचा मस्त आनंद लुटला.निर्मात्यांनी सर्व कलाकारांसाठी पिवळे पोशाख आणि एकसारखे दिसणारे गॉगल्स आणले। हळदी समारंभ एवढ्‌या मोठ्‌या प्रमाणावर असेल तर लग्न किती भव्य असेल.उत्साहात असलेली वधू निमकी म्हणाली, “लग्नाच्या सीक्वेन्सची मी पूर्ण मजा लुटत आहे. निमकी एक आनंदी वधू आहे आणि आपल्या लग्नाच्या छोट्‌या छोट्‌या गोष्टींकडे तिचे लक्ष आहे. माझे खरे लग्न अजून खूप लांब असले तरी हा पडद्यावरचा अनुभवही खूप छान आहे. मला खात्री आहे की जेवढी मजा आम्हांला चित्रीकरण करताना आली तेवढीच मजा प्रेक्षकांना हा भाग पाहताना येईल.” निम्कीच्या साखरपुड्यात मोनालिसाने आपले  नृत्य सादर केले. टॉलीवूडमधली एक विख्यात अभिनेत्री असलेली मोनालिसा ही आपल्या ठुमक्यांसाठी प्रसिध्द आहे. या मालिकेचे कथानक बिहारमध्ये घडत असल्याने मोनालिसाचे नृत्य त्यात टाकण्यात आले. ‘आ रे प्रीतम प्यारे’ या गाण्यावर मोनालिसा नृत्य सादर केले. ‘निम्की मुखिया’ मालिकेची नायिका भूमिका गुरुंग सध्या ग्लॅमजगताचा अनुभव घेत असून त्यात तिचे वैयक्तिक जीवनही खाजगी राहात नाही,कलाकार त्यांच्या खाजगी आयुष्यात काय काय करतात हे जाणून घेण्याची त्यांच्या चाहत्यांची इच्छा असते. त्यामुळे भूमिकालाही सध्या तिचे चाहते वेगवेगळ्या गोष्टींवर अनेक प्रश्न विचारत असतात.सध्या भूमिका गुरूंग एका फोटोमुळे चर्चेत आली आहे.