Join us

विवियनला लागलेय कॉफीचे वेड

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2016 13:14 IST

शक्ती... अस्तित्त्व के एहसास की या मालिकेत विवियन डिसेना एका पंजाबी मुलाची भूमिका साकारत आहे. विवियनची ही भूमिका प्रेक्षकांना ...

शक्ती... अस्तित्त्व के एहसास की या मालिकेत विवियन डिसेना एका पंजाबी मुलाची भूमिका साकारत आहे. विवियनची ही भूमिका प्रेक्षकांना खूप आवडत आहे. त्याच्या या भूमिकेमुळे त्याच्या फॅन्सच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. विवियनचे अनेक फॅन्स असले तरी तो स्वतः एका गोष्टीचा मोठा फॅन आहे. विवियन कॉफीचा फॅन आहे. त्याला सतत कॉफी प्यायला आवडते आणि त्यातही त्याची कॉफी त्याला पाहिजे तशी बनवली गेली नसेल तर ते त्याला आवडत नाही. त्याला पाहिजे तशी कॉफी मिळावी यासाठी त्याने कॉफी बनवण्याची मशिनच मालिकेच्या सेटवर आणून ठेवली आहे. या मशिनमुळे मला पाहिजे तशी कॉफी सध्या मी सेटवरही पिऊ शकत आहे असे विवियन सांगतो.