Join us  

विशाल-शेखर, अरमान मलिक आणि शिरले सेटिया 'पोकेमॉन'च्या नव्या सीरिजसाठी एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2024 6:48 PM

Pokemon : पोकेमॉन कंपनीने ‘पोकेमॉन हॉरिझॉन द सीरिज’ ही नवीन सीरिज हंगामावर २५ मे रोजी आणण्याची घोषणा केली आहे.

पोकेमॉन कंपनीने ‘पोकेमॉन हॉरिझॉन द सीरिज’ ही नवीन सीरिज हंगामावर २५ मे रोजी आणण्याची घोषणा केली आहे. यासंबंधी पत्रकार परिषद मुंबईतील जुहू येथील जे डब्ल्यू मॅरियट हॉटेलमध्ये घेण्यात आली. त्यात ओरिजिनल ओपनिंग आणि एंडिंग साऊंडट्रॅकचे अनावरण करण्यात आले. प्रसिद्ध संगीतकार विशाल शेखर यांनी हे साऊंडट्रॅक तयार करण्यात आले आहेत. अरमान मलिक आणि शिरले सेटिया यांचा आवाज आहे. 

पोकेमॉन कंपनीबरोबर केलेल्या या कामाबद्दल बोलताना विशाल आणि शेखर म्हणतात, जेव्हा आम्हाला पोकेमॉन कंपनीकडून काम करण्यासाठी फोन आला तेव्हा आम्हाला अतिशय आनंद झाला. आम्ही ब्रँडची ओळख असलेल्या, त्यात भरपूर आनंद आणि अँडव्हेन्चर असलेल्या चाली आम्ही रचल्या. आपल्या स्थानिक प्रेक्षकांना आवडावं यासाठी त्याला एक भारतीय चेहरा दिला. आम्हाला आशा आहे की जेव्हा लोक टीव्ही पासून दूर असतील तेव्हाही त्यांना या अॅनिमेटेड सीरिजची चाल आठवत राहील.

अरमान मलिक म्हणाला, लहानपणी मी पोकेमॉन कार्ड्स खेळायचो. एक दिवशी याच सीरिजचं टायटल साँग हिंदी, तामिळ आणि तेलुगूमध्ये मला गायला मिळाले हे सगळं स्वप्नवत आहे. जेव्हा मी लहान होतो तेव्हा पोकेमॉन पाहणे ही एक प्रथाच पडली होती. त्यामुळे हॉरिझॉन सीरिजसाठी त्याला आवाज देणे हा माझ्यासाठी फक्त सन्मानच नाही तर आयुष्याचं एक वर्तुळ पूर्ण झालं आहे असं मला वाटतं. विशाल शेखरने पोकेमॉनचा जागतिक पातळीवर असलेला प्रभाव ओळखून काही पारंपरिक आवाजही त्यात घातले आहे. ही चाल सगळ्या पिढ्यांना आपलीशी वाटेल अशी आहे. नाविन्य आणि नॉस्टॅलजिया यांचा संगम असलेल्या या सीरिजचा सगळ्यांनी आस्वाद घ्यावा याची मी आतुरतेने वाट पाहतो आहे. 

शिरले सेटिया म्हणाली, आपल्या बालपणाचा अविभाज्य भाग असलेल्या एखाद्या गोष्टीवर काम करणे हा सन्मानच आहे. मला पोकेमॉनचे सॉफ्ट टॉय आणि इतर वस्तू विकत घेणं मला आधीही आवडायचे आणि आताही आवडते. या सीरिजसाठी गाणं हा माझ्यासाठी अतिशय अविश्वसनीय अनुभव होता. या चालीचा फॅन्सवर दीर्घकाळासाठी प्रभाव पडेल असे मला वाटते. 

टॅग्स :विशाल ददलानी