Join us  

'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत पहिल्यांदाच विशाल निकम आणि पूजा बिरारी एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2024 6:54 PM

Vishal Nikam And Pooja Birari : येड लागलं प्रेमाचं मालिकेतून विशाल निकम हटके अंदाजात पाहायला मिळणार आहे. त्याच्यासोबत या मालिकेत अभिनेत्री पूजा बिरारी मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

स्टार प्रवाहवर २७ मे पासून सुरु होणाऱ्या 'येड लागलं प्रेमाचं' (Yed Lagala Premacha) मालिकेची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. या मालिकेतून विशाल निकम (Vishal Nikam) हटके अंदाजात पाहायला मिळणार आहे. त्याच्यासोबत या मालिकेत अभिनेत्री पूजा बिरारी (Pooja Birari) मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने ते दोघे पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार आहेत. 

या मालिकेबद्दल विशाल निकम म्हणाला की, माणसाला अंतर्बाह्य बदलून टाकतं ते प्रेम. प्रेमात समोरच्याला बदलण्याचा अट्टहास नसतो, जे जसं आहे ते अगदी तसं त्याच्या पूर्ण गुण-दोषांसकट स्वीकारणं म्हणजे प्रेम. येड लागलं प्रेमाचं ही मालिकाही प्रेमातल्या वेडपणाची साक्ष देणारी असेल. महाराष्ट्राचं कुलदैवत अशी ओळख असणाऱ्या विठुरायाच्या पंढरपुर नगरीत या मालिकेची गोष्ट घडणार आहे. राया आणि मंजिरी या मालिकेतली प्रमुख पात्र. एकमेकांचा तिरस्कार करणाऱ्या राया आणि मंजिरीचा प्रेमात पडण्यापर्यंतचा प्रवास म्हणजे येड लागलं प्रेमाचं ही मालिका.

तर पूजा बिरारीसोबत काम करण्याबद्दल अभिनेता म्हणाला की, पूजा बिरारीसोबत मी पहिल्यांदा काम करतो आहे. पूजा खूप समजूतदार आहे. ती स्वत:पेक्षा दुसऱ्याचा जास्त विचार करते. माणूस म्हणून ही सर्वात मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं. पुजाच्या याच स्वभावामुळे आमचे सीन्स खूप छान होत आहेत. मालिकेत मंजिरी आणि रायाचे विचार फार वेगळे आहेत. मात्र खऱ्या आयुष्यात माझी आणि पुजाची छान मैत्री आहे. राया – मंजिरीच्या जोडीला प्रेक्षकांचं प्रेम मिळावं हीच इच्छा. 

टॅग्स :विशाल निकम