Join us  

'कठीण काळात कमावलेलं पुण्य आयुष्यभर ऊर्जा देईल', अभिनेत्री अश्विनी महांगडेची पोस्ट वाचून कराल कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2021 2:14 PM

अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने कोरोनाच्या संकटात अनेक लोकांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे.

स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतील राणू आक्का साहेब यांच्या भूमिकेतून अभिनेत्री अश्विनी महांगडे घराघरात पोहचली. सध्या ती स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करते या मालिकेत अनघाची भूमिका साकारते आहे. अश्विनीने दोन वर्षांपूर्वी रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठानची स्थापना केली असून या माध्यमातून तिने अनेक गरजूंना मदत केली आहे. कोरोनाच्या संकटातही तिने अनेक लोकांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. नुकतीच अश्विनीने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. जी वाचून तुम्ही तिचे कौतुक कराल.

अश्विनी महांगडे हिने इंस्टाग्रामवर घरोघरी जाणाऱ्या डब्यांच्या पिशव्यांचा फोटो शेअर करत कोरोनाच्या संकटात घरोघरी जेवण पोहचवणाऱ्या रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठानमधील टीमचे कौतूक केले आहे. तिने म्हटले की, आजाराचा बाजार करून कमवणारे एकीकडे व हे पुण्य कमवणारे एकीकडे. या बाजारातून कमावलेली हरामची कमाई एक दिवस नक्की संपेल पण या कठीण काळात कमावलेले हे पुण्य आयुष्यभर सोबत उर्जा देत राहील व कुठेच कमी पडू देणार नाही.

तिने पुढे म्हटले की, रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य ची संपूर्ण टीम व हक्काचे कुटूंब फक्त जेवणचं नाही तर जेवणासोबत एक सकारात्मक विचारही पोहचवण्याचे काम करीत आहे. कोण काय करतोय हे पाहण्यापेक्षा आपण स्वत: काय करतोय हे पाहणे खुप महत्वाचे असते. मा.मनिषा ताई तामस्कर : नागपूर, शितल ताई लाडके : नवी मुंबई व संपूर्ण टीम आपले विशेष कौतुक.खुप समाधान मिळते व कौतुक वाटते या सगळ्यांचे. 

महाराष्ट्रात कोरोनाचे थैमान दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.

रुग्णांना बेड, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर मिळत नाही. अशा परिस्थितीत रुग्णांची आणि पर्यायाने त्यांच्या सोबत आलेल्या नातेवाईकांची जेवणाशिवाय हेळसांड होऊ नये, यासाठी अश्विनी महांगडे आणि रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठानने पुढाकार घेतला आहे. खरेच अश्विनीच्या या कार्याचे कौतुक करावे तितके कमीच आहे.

टॅग्स :अश्विनी महांगडेकोरोना वायरस बातम्यास्टार प्रवाह