Join us

​वत्सल सेठ आणि संजिदा सेठचे गेहराईयाँसाठी होतेय कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2017 14:21 IST

वत्सल सेठ आणि संजिदा सेठ यांनी एक हसिना थी या मालिकेत काम केले होते. या मालिकेतील त्यांच्या जोडीची चांगलीच ...

वत्सल सेठ आणि संजिदा सेठ यांनी एक हसिना थी या मालिकेत काम केले होते. या मालिकेतील त्यांच्या जोडीची चांगलीच चर्चा झाली होती. या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड भावली होती. आता ते दोघे पुन्हा एकदा प्रेक्षकांना एकत्र दिसत आहे.वत्सल आणि संजिदा आता मालिकेत नव्हे तर वेबसिरिजमध्ये प्रेक्षकांना एकत्र पाहायला मिळत आहेत. या वेबसिरिजचे नाव गेहराईयाँ असे असून यात दोघेही आपल्याला खूपच वेगळ्या भूमिकेत आणि लूकमध्ये पाहायला मिळत आहेत. वत्सलच्या भूमिकेचे तर चांगलेच कौतुक केले जात आहे. आतापर्यंतच्या त्याच्या कारकिर्दीतील ही सगळ्यात आव्हानात्मक भूमिका असल्याचे वत्सल सांगतो. त्याने अशाप्रकारची भूमिका कधीच साकारली नसल्याने ही भूमिका साकारताना त्याला खूप मजा येत असल्याचेही तो सांगतो. गेहराईयाँ या वेबसिरिजमध्ये संजिदा आणि वत्सल गावात राहाणाऱ्या एका जोडप्याची कथा साकारत आहेत. आपल्या प्रेमासाठी त्यांना कोणकोणत्या परिस्थितींचा सामना द्यावा लागतो हे प्रेक्षकांना यात पाहायला मिळणार आहे. या भूमिकेविषयी वत्सल सांगतो, मला या भूमिकेविषयी विचारण्यात आले त्यावेळीच मी या भूमिकेच्या प्रेमात पडलो होतो. मी आतापर्यंत साकारलेल्या सगळ्या भूमिकांपेक्षा ही एक आव्हानात्मक भूमिका असून अशी भूमिका मी कधीच साकारलेली नाहीये. त्यामुळे मी ही भूमिका एन्जॉय करत आहे. विक्रम भट्ट सारख्या दिग्दर्शकासोबत या वेबसिरिजमुळे मला काम करण्याची संधी मिळाली आहे. या वेबसिरिजमध्ये मी भूत दाखवला जाणार होता. पण मी भूताच्या भूमिकेसाठी योग्य नसल्याचे विक्रमला वाटले असल्याने कथा थोडीशी बदलण्यात आली.