Join us

'डान्स महाराष्ट्र डान्स'मध्ये व्हॅलेंटाईन डेच सेलिब्रेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2018 15:18 IST

फेब्रुवारी म्हणजे प्रेम आणि रोमान्सचा महिना आणि व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने डान्स महाराष्ट्र डान्स देखील प्रेक्षकांसाठी हा प्रेमाचा सोहळा साजरा ...

फेब्रुवारी म्हणजे प्रेम आणि रोमान्सचा महिना आणि व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने डान्स महाराष्ट्र डान्स देखील प्रेक्षकांसाठी हा प्रेमाचा सोहळा साजरा करणार आहे. व्हॅलेंटाईन डे च्या खास एपिसोडमध्ये झी युवाच्या मालिकेतील प्रेक्षकांचे लाडके कलाकार परफॉर्म करणार आहेत.प्रेक्षकांचा व्हॅलेंटाईन्स डे खास बनवण्यासाठी या स्पेशल एपिसोडमध्ये बापमाणूस मधील सूर्या (सुयश टिळक) आणि गीता (श्रुती अत्रे) 'हृदयात वाजे समथिंग'या गाण्यावर परफॉर्म करणार आहेत.फुलपाखरू या मालिकेतील मानस (यशोमन आपटे) आणि वैदेही (ऋता दुर्गुळे) तसेच अंजली मालीकेतील डॉ. असीम (पियुष रानडे) आणि डॉ. अंजली (सुरुची अडारकर) देखील परफॉर्म करणार आहेत.व्हॅलेंटाईन डे स्पेशल एपिसोडमधील परफॉर्मन्सबद्दल बोलताना ऋता दुर्गुळे म्हणाली,प्रेम व्यक्त करण्यासाठी एकच दिवस नसला पाहिजे. वर्षातील प्रेत्येक दिवस हा प्रेमाचा दिवस असला पाहिजे. यावेळी व्हॅलेंटाईन डे डान्स महाराष्ट्र डान्स सोबत साजरा करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे.तसेच आमच्या परफॉर्मन्स सोबत असे अनेक दमदार परफॉर्मन्सेस असणार आहेत जे प्रेक्षकांचा व्हॅलेंटाईन डे स्पेशल बनवतील.सिनेकलाकारांच्या दमदार परफॉर्मन्सेसनी या कार्यक्रमाला चार चांद लावलेत तसेच या खास कार्यक्रमाच्या उत्साहात भर घातली ती म्हणजे प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेता वैभव तत्ववादीने.या कार्यक्रमात तो लोकप्रिय सिनेमा सैराट मधील गाण्यांवर टॅलेंटेड डान्सर मीरा जोशी सोबत परफॉर्म करणार आहे.या सीझनची थीम आहे रोमान्स आणि मयुरेश पेम आणि माधवी निमकर 'टाइमपास' सिनेमातील 'दाटले रेशमी' या प्रसिद्ध रोमँटिक गाण्यावर परफॉर्म करणार आहेत.या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा सांभाळली इंडस्ट्रीतील हास्यसम्राट व्यक्तीमत्व नम्रता आवटे आणि प्रियदर्शन जाधव यांनी.फक्त एवढेच नाही.योगेश शिरसाट,सुहास परांजपे, आरती सोळंकी आणि समीर चौगुले हे विनोदवीर त्यांच्या कॉमेडीने प्रेक्षकांना मनोरंजित करणार आहेत.संगीत, लावणी, कथक आणि बहु-सांस्कृतिक परफॉर्मन्सेस आणि बरेच काही 'हृदयात वाजे समथिंग'द्वारे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.कोल्हापूरकरांसमोर परफॉर्म करण्याची भावना व्यक्त करताना वैभव तत्ववादी म्हणाले,फेब्रुवारी हा प्रेमाचा महिना आहे आणि अशा खास व विलक्षण उत्सवात सामील होण्यासाठी मला अतिशय आनंद झाला आहे. व्हॅलेंटाइन डे आता अगदी जवळ आला असताना,आम्ही सैराट मधील प्रेक्षकांना आवडणारी प्रेमाची गाणी निवडली आहेत.