उर्वषी ढोलकियाला मिळाली धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2017 12:42 IST
कसौटी जिंदगी की या मालिकेतील कोमालिका या व्यक्तिरेखेमुळे उर्वषी ढोलकिया नावारूपाला आली. ती त्यानंतर अनेक मालिकांमध्ये झळकली. बिग बॉस ...
उर्वषी ढोलकियाला मिळाली धमकी
कसौटी जिंदगी की या मालिकेतील कोमालिका या व्यक्तिरेखेमुळे उर्वषी ढोलकिया नावारूपाला आली. ती त्यानंतर अनेक मालिकांमध्ये झळकली. बिग बॉस या मालिकेचे तर तिने विजेतेपद मिळवले होते. उर्वषी लवकरच छोट्या पडद्यावर कमबॅक करणार असल्याची चर्चा आहे. पण एका मालिकेच्या निर्मात्यांनी उर्वषीला धमकी दिली असल्याचे कळत आहे. उर्वषीने तिचे वजन कमी न केल्यास तिला मालिकेतून काढण्यात येईल असे त्यांनी तिला सांगितले आहे. या धमकीविरोधात आवाज उठवण्याचे उर्वषीने ठरवले आहे. या विरोधात तिने फेसबुकला एक पोस्ट टाकली आहे. तिने यात म्हटले आहे की, आजकाल लोकांना बारीक दिसण्याचे वेड लागले आहे. मला स्वतःला बारीक होऊन माझी हाडे दाखवायला आवडत नाही. झिरो साइजचा तर मला प्रचंड राग येतो. मी जशी आहे तशीच मला आवडते. मी एक स्त्री आहे, मी बार्बी डॉल नाही. मी आहे तसा माझा स्वीकार करा अन्यथा मला सोडून द्या. बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर काही दिवस उर्वषी रुग्णालयात होती आणि त्याबद्दल तिने नुकतेच एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. ती सांगते, बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर मी 15 दिवस रुग्णालयात होते. मला लो फाइबर डाएट घेण्याचा सल्ला दिला होता आणि त्यामुळे माझे वजन प्रचंड वाढले होते. पण त्यानंतर मी वजन कमी करण्यासाठी काही प्रयत्न केला नाही. वजन कमी करण्यासाठी स्वतःला त्रास देणे ही गोष्टच मला पटत नाही. पण हेच वजन माझ्या करियरच्या मध्ये येत असल्याचे मला आता जाणवत आहे. कारण या वजनामुळे मला मालिकेतून बाहेर काढण्याची धमकी देण्यात आली आहे.