Join us  

​संगीत सम्राट पर्व २ मध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार या गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2018 11:54 AM

झी युवावरील 'संगीत सम्राट' या कार्यक्रमाच्या पहिल्या पर्वाला प्रेक्षकांचे प्रेम लाभले आणि त्यांच्या उदंड प्रतिसादानेच झी युवा संगीत सम्राट ...

झी युवावरील 'संगीत सम्राट' या कार्यक्रमाच्या पहिल्या पर्वाला प्रेक्षकांचे प्रेम लाभले आणि त्यांच्या उदंड प्रतिसादानेच झी युवा संगीत सम्राट पर्व २ प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे. नवे पर्व अधिक रंजक बनवण्यासाठी या कार्यक्रमाच्या रूपरेषेत काही बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे हे पर्व एका वेगळ्या अवतारात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. संगीत सम्राट पर्व दुसरे मध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील होतकरू गायक आणि संगीतकारांना त्यांची कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाणार आहे. या पर्वामधील एक प्रमुख रंजक बदल म्हणजे या वेळी स्पर्धक हे काही टीम्सचा भाग असणार आहेत आणि या टीम्सचे काही कॅप्टन्स असणार आहेत. कॅप्टन म्हणजे दुसरे कोणी नसून स्पर्धकांचे मार्गदर्शकच असणार आहेत आणि ते या स्पर्धकांना स्पर्धेसाठी अधिक सक्षम बनवण्यासाठी मदत करणार आहेत.कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऑडिशन, स्पर्धकांची निवड आणि त्यांचं टीम मध्ये केलेलं सिलेक्शन या गोष्टी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. कॅप्टन्सना त्यांच्या टीममध्ये स्पर्धक निवडण्याचं स्वातंत्र्य आहे. कार्यक्रमाची नवीन रूपरेषा हे या पर्वाचे मुख्य आकर्षण आहे. शास्त्रीय संगीत आणि लोकसंगीत यात पारंगत असलेले लोकप्रिय गायक राहुल देशपांडे आणि आदर्श शिंदे यासारख्या परीक्षांमुळे स्पर्धकांना संगीताचे विद्यापीठच उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्रातील सहा शहरांतून पारखून संगीत सम्राट पर्व २ च्या मंचावर उत्तम टॅलेंट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या स्पर्धकांना कार्यक्रमातील कॅप्टन्स म्हणजेच हरहुन्नरी गायक सावनी रवींद्र, अभिजीत कोसंबी, राहुल सक्सेना आणि जुईली जोगळेकर योग्य मार्गदर्शन देणार आहेत जेणेकरून स्पर्धेच्या पुढील वाटचालीत स्पर्धक त्यांचं १०० टक्के देऊ शकतील.महाराष्ट्राच्या पहिल्या संगीत सम्राट बनण्याचा मान, अहमदनगरमधील 'नंदिनी अंगद गायकवाड आणि अंजली अंगद गायकवाड' या दोन सख्ख्या बहिणींना मिळाला होता. या दोन्ही बहिणींनी सुरुवातीपासून उत्तोमोत्तम सादरीकरण करत दोन्ही परीक्षक आदर्श शिंदे आणि क्रांती रेडकर यांच्या आणि प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. त्यांच्या पहिल्या परफॉर्मन्सपासून आदर्श आणि क्रांती या दोघांनीही या दोघांचेही भरभरून कौतुक केले होते. महा अंतिम सोहळ्यासाठी सुद्धा त्यांनी जय्यत तयारी केली होती. शात्रीय संगीताचा वारसा  लाभलेल्या या बहिणींनी निरनिराळे परफॉर्मन्सच्या सादर करत आपले सांगीतिक क्षेत्रातील टॅलेंट दाखवुन दिले आहे. Also Read : सुयश टिळक आणि पल्लवी पाटील सोबत होणार या कार्यक्रमासाठी ऑडीशन!