Join us  

लाटणं हरवलंय..! शशांकने 'मुरांबा'च्या सेटवरील व्हिडीओ केला शेअर, पत्नीच्या कमेंटनं वेधलं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2024 12:59 PM

Shashank Ketkar :अभिनेता शशांक केतकरने मुरांबा मालिकेच्या सेटवरील मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळत आहे. इतकेच नाही तर कमेंटमध्ये शशांकच्या पत्नीने केलेल्या कमेंटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'मुरांबा'(Muramba) नं कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील रमा आणि अक्षयची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते. या मालिकेत अक्षयची भूमिका अभिनेता शशांक केतकर (Shashank Ketkar) याने साकारली आहे. तर रमाची भूमिका शिवानी मुंढेकर हिने निभावली आहे. दरम्यान अभिनेता शशांक केतकरने मुरांबा मालिकेच्या सेटवरील मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळत आहे. इतकेच नाही तर कमेंटमध्ये शशांकच्या पत्नी प्रियंका केतकर (Priyanka Ketkar)ने केलेल्या कमेंटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

अभिनेता शशांक केतकर याने इंस्टाग्रामवर मुरांबाच्या सेटवरील व्हिडीओ केला आहे. या व्हिडीओत शशांक सांगतो आहे की, मालिकेत मी पोळ्या लाटतोय हा सीन सूट करत होतो. १० मिनिटं झाली माझा तो सीन संपून...पोळीसाठी लागणारी साधनसामुग्री मी कट्ट्यावर ठेवली होती. अचानक सेटवरून लाटणं हरवलं आणि अख्खा सेट लाटणं शोधतंय. पाहा असे म्हणत त्याने सेटवरील परिस्थिती दाखवली. त्यात सगळे लाटणे शोधताना दिसत आहेत. इतक्यात एक जण दुसऱ्या सेटवरील लाटणं घेऊन आला. त्यानंतर पुन्हा शशांक व्हिडीओत म्हणतोय की, उद्या मी हरवलो तर मला इतके शोधायचे नाही. लाटणं शोधताहेत.

शशांकच्या पत्नीची मजेशीर कमेंट

शशांक केतकर याने इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, लाटणं हरवलं आहे. त्याच्या या व्हिडीओला चाहत्यांची खूप पसंती मिळत आहे. त्याच्या या पोस्टवर चाहते मजेशीर कमेंट करत आहेत. मात्र त्याच्या पत्नीच्या कमेंटने सर्वांचं लक्ष वेधून घेतले आहे. तिने लिहिले की, हे लाटणं घरी हरवलं असतं तर नक्की ऋग्वेदच्या खेळण्याच्या बास्केटमध्ये मिळालं असतं! एका युजरने कमेंटमध्ये लिहिले की, तुला पण शोधतील नाहीतर मुरांबा मालिका कशी पुढे जाणार. तर आणखी एका युजरने सांगितले की, खरेतर काल ही सारखीच परिस्थिती आमच्याकडे झाली होती...खूप शोधले शेवटी मी आमच्या पोळ्या वाल्या मावशींना फोन लावला. 

टॅग्स :शशांक केतकरस्टार प्रवाह