Join us

​टेरेन्सची दिलदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2016 16:38 IST

कोरियग्राफर टेरेन्स लुईसच्या मनाची दिलदारी समोर आलीय.. सो यू थिंक यू कॅन डान्स-अब इंडिया की बारी या डान्स रियालिटी ...

कोरियग्राफर टेरेन्स लुईसच्या मनाची दिलदारी समोर आलीय.. सो यू थिंक यू कॅन डान्स-अब इंडिया की बारी या डान्स रियालिटी शोमधील दोन स्पर्धकांना आर्थिक मदतीचा हात देण्याचा निर्णय टेरेन्सनं घेतलाय. या शोमधील कल्पिता आणि आर्यनला मदत करण्याची घोषणा टेरेन्सनं केलीय.. गुस्ताख दिल या गाण्यावर कल्पिता आणि आर्यननं केलेल्या डान्सनं टेरेन्स भारावून गेलाय. हे दोघंही उत्तम डान्सर असून त्यांच्या या डान्सनं श्वास रोखून धरला होता असं टेरेन्सनं म्हटलंय. या दोघांच्या प्रशिक्षण आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील परफॉर्मन्सची जबाबदारी घेत असल्याचं त्यानं जाहीर केलं.शोमध्ये धकधक गर्ल माधुरी दीक्षित-नेने, टेरेन्स आणि कोरियोग्राफर बोस्को मार्टिस जजच्या भूमिकेत आहेत.. टेरेन्सनं दाखवलेल्या या दिलदारीचं कौतुक नक्कीच व्हायला हवं.