Join us

​मेरे साई मालिकेत या भूमिकेत दिसणार तरुण खन्ना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2018 17:48 IST

टेलिव्हिजन अभिनेता तरुण खन्नाची लवकरच मेरे साई या मालिकेत एंट्री होणार आहे. यामध्ये तो रत्नाकर नामक व्यक्तिरेखा साकारणार आहे. ...

टेलिव्हिजन अभिनेता तरुण खन्नाची लवकरच मेरे साई या मालिकेत एंट्री होणार आहे. यामध्ये तो रत्नाकर नामक व्यक्तिरेखा साकारणार आहे. रत्नाकर हा एक श्रीमंत व्यापारी असून तो नुकताच परदेशातून भारतात परतला आहे. आपल्या सुरुवातीच्या कारकिर्दीत तरुणने काही पौराणिक मालिकांमध्ये काम केले होते. तो साई बाबांचा निस्सीम भक्त आहे आणि साईंच्या श्रद्धा आणि सबुरी या शिकवणीवर त्याची अढळ श्रद्धा आहे. छोट्या पडद्यावर पौराणिक व्यक्तिरेखा साकारल्यानंतर आता एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांना तो दिसणार आहे. मेरे साई या मालिकेमध्ये रत्नाकरची भूमिका साकारण्याबद्दल तरुण खन्ना सांगतो, “या मालिकेतील माझ्या व्यक्तिरेखेचे नाव रत्नाकर आहे. तो एक धनाढ्य व्यापारी आहे आणि परदेशातून भारतात परतला आहे. पैसा हे त्याच्यासाठी सर्वस्व आहे आणि पैसे मिळवण्यासाठी तो काहीही करू शकतो. साई बाबांना भेटल्यानंतर त्याचा कसा कायापालट होतो आणि तो कसा साईभक्त होतो, त्याची ही गोष्ट आहे. मी आजवर अनेक पौराणिक मालिकांमधून काम केले आहे आणि पहिल्यांदाच टेलिव्हिजनवर अशी वेगळी भूमिका साकारतो आहे. मी साई बाबांचा भक्त आहे आणि त्यांच्या श्रद्धा आणि सबुरी या दोन्ही शिकवणींवर माझी नितांत श्रद्धा आहे. या मालिकेचा भाग होणे ही माझ्यासाठी गौरवाची गोष्ट आहे.साई बाबांच्या जीवनविषयक शिकवणीने जगभरातील त्यांच्या लाखो अनुयायांना प्रभावित केले आहे. सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील मेरे साई ही मालिका त्यांच्या जीवनावर आधारित आहे. या मालिकेचा उद्देश समस्त प्रेक्षकवर्गात दया आणि मानवतेच्या संदेशाचा प्रसार करणे हा आहे. या मालिकेत अबीर सुफी साईबाबांची भूमिका साकारत आहे. या मालिकेला प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळत आहे. या मालिकेत साई बाबांची भूमिका अभिनेता अबीर सुफी साकारत असून त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. त्याच्यासोबतच या मालिकेत तोरल रासपुत्र, वैभव मांगले, शर्मिला राजाराम या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. या मालिकेची निर्मिती दशमी क्रिएशन्सची आहे. Also Read : प्यारेलालजी यांनी ‘मेरे साई’साठी तयार केले गीत