Join us  

तारक मेहता का उल्टा चष्मामधील पोपटलाल खऱ्या आयुष्यात आहे विवाहित, पाहा त्याच्या कुटुंबियांचे फोटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 7:05 PM

श्यामचे खऱ्या आयुष्यात लग्न झाले असून त्याला तीन मुलं आहेत. सोशल मीडियावरील त्याच्या अकाऊंटवर आपल्याला त्याच्या मुलांचे आणि पत्नीचे फोटो पाहायला मिळतात

ठळक मुद्देपोपटलाल तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत पत्रकार असल्याचे दाखवण्यात आले असले तरी श्याम खऱ्या आयुष्यात चार्टड अकाऊंटट आहे. पण त्याला अभिनयाची आवड असल्याने तो या क्षेत्राकडे वळला.

तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. या मालिकेत प्रेक्षकांना नेहमीच धमाल मस्ती पाहायला मिळते. या मालिकेतील पोपटलाल तर प्रेक्षकांचा प्रचंड लाडका आहे. या मालिकेत आपल्याला पोपटलालच्या भूमिकेत श्याम पाठकला पाहायला मिळते. पोपटलाल हा एक पत्रकार असून त्याच्या हातात आपल्याला नेहमी एक छत्री पाहायला मिळते. 

पोपटलाल हा लग्नासाठी प्रचंड उत्सुक असतो. प्रत्येक मुलीला आपकी शादी हुई क्या असे तो विचारत असतो. पोपटलालचे लग्न कधी होणार असा प्रश्न नेहमीच त्याच्या चाहत्यांना पडलेला असतो. पण तुम्हाला माहीत आहे का, श्यामचे खऱ्या आयुष्यात लग्न झाले असून त्याला तीन मुलं आहेत. सोशल मीडियावरील त्याच्या अकाऊंटवर आपल्याला त्याच्या मुलांचे आणि पत्नीचे फोटो पाहायला मिळतात.

पोपटलाल तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत पत्रकार असल्याचे दाखवण्यात आले असले तरी श्याम खऱ्या आयुष्यात चार्टड अकाऊंटट आहे. पण त्याला अभिनयाची आवड असल्याने तो या क्षेत्राकडे वळला. श्यामने नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून अभिनयाचे धडे गिरवले आहेत. तिथेच शिकत असताना श्यामची ओळख रेशमीशी झाली. दोघे एकत्रच अभिनयाचे धडे गिरवत होते. त्यांच्यात मैत्री झाली आणि या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले आणि त्यांनी काहीच वर्षांत लग्न केले. श्याम आणि रेशमी यांना एक मुलगा आणि दोन मुली आहेत. 

श्याम पाठकने तैवान भाषेतील चित्रपटाद्वारे त्याच्या अभिनयकारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यानंतर जशोदाबेन जयंतीलाल जोश की ज्वाइंट फैमिली, सुख बाइ चांस यांसारख्या मालिकांमध्ये काम केले. पण त्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता ही तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील पोपटलाल या भूमिकेमुळे मिळाली. 

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील बहुतांश कलाकारांची ही पहिलीच मालिका होती. पण त्यांच्या पहिल्याच मालिकेने त्यांना खूप फेमस बनवले. आज जेठालाल, दया, आत्माराम भिडे, माधवी भिडे, तारक मेहता, अंजली, अय्यर, बबिता, टप्पू, पोपटलाल, नट्टू काका या सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या आहेत.

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍मा