Join us  

दलित समाजाबद्दलचे वक्तव्य तारक मेहता फेम मुनमुन दत्ताला भोवलं, अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 11:21 AM

काही दिवसांपूर्वी मुनमुनने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला होता. यात तिने जातीवाचक शब्दांचा उल्लेख करत अपमानजनक वक्तव्य केलं होतं.

ठळक मुद्देमुंबईतील अंबोली पोलीस स्टेशनमध्ये तिच्या विरोधात अ‍ॅट्रोसिटीचा (atrocity act) गुन्हा दाखल झाला आहे.

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या टीव्हीवरच्या सर्वाधिक लोकप्रिय मालिकेतील बबिताजी अर्थात अभिनेत्री मुनमुन दत्ता (Munmun Dutta) अडचणीत सापडली आहे. मुनमुन दत्ता (Munmun Dutta) ने दलित समाजाबद्दल केलेले वक्तव्य चांगलेच महागात पडले आहे. मुंबईतील अंबोली पोलीस स्टेशनमध्ये तिच्या विरोधात अ‍ॅट्रोसिटीचा (atrocity act) गुन्हा दाखल झाला आहे.

काही दिवसांपूर्वी मुनमुनने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला होता. यात तिने जातीवाचक शब्दांचा उल्लेख करत अपमानजनक वक्तव्य केलं होतं. त्यामुळे तिच्या विरोधात हरियाणामधील हांसीमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्यानंतर आता मुंबईत तिच्याविरोधात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध नियम (अ‍ॅट्रोसिटी अ‍ॅक्ट) 2015 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?मुनमुनने व्हिडीओत एका जातीवाचक शब्दाचा वापर केला होता. ‘मी युट्यूबवर येणार आहे आणि मला चांगले दिसायचे आहे. मला कुण्या ***** सारखे दिसायचे नाही,’ असे मुनमुन या व्हिडीओत म्हणताना दिसली़. तिचा हा व्हिडीओ क्षणात व्हायरल झाला आणि तो पाहताच लोकांनी तिला फैलावर घेतले. प्रकरण अंगलट येण्याची चिन्हे दिसताच मुनमुनने माफी मागितली. व्हिडीओतील एका शब्दाचा चुकीचा अर्थ काढला गेला. कुणाचाही अपमान करण्याचा, त्यांना धमकावण्याचा, कुणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. भाषेच्या अडचणीमुळे मी तो शब्द चुकीचा अर्थाने घेतला. पण माझी चूक लक्षात आणून देताच मी तो शब्द मागे घेतला. माझ्या मनात प्रत्येक जातीधर्माबद्दल समाजाबद्दल पूर्ण आदर आहे. अजानतेपणी झालेल्या या चुकीसाठी मी सर्वांची माफी मागते. मी कुणाच्याही भावना दुखावल्या असतील तर दिलगीरी व्यक्त करते, असे तिने तिच्या माफीनाम्यात लिहिले होते.

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍मामुनमुन दत्ता