Join us  

निर्मात्यांनी आमच्यासाठी योग्य निर्णय घेतला आहे, पण... नट्टू काकाने मांडली त्यांची बाजू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 12:12 PM

कोरोनाच्या या स्थितीमुळे आपल्या करियरबाबात तारक मेहता का उल्टा चष्मा मधील नट्टू काका म्हणजेच घनश्याम नायक यांना देखील टेन्शन आले असल्याच्या बातम्या मीडियात आल्या होत्या.

ठळक मुद्देघनश्याम यांनी मुलाखतीत सांगितले आहे की, अशा नकारात्मक बातम्या कोण पसरवत आहेत हेच मला कळत नाहीये. सध्या सगळ्यांची परिस्थिती अतिशय वाईट आहे.

कोरोनामुळे गेल्या वर्षभरात अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. छोट्या आणि मोठ्या पडद्यावर काम करणाऱ्या काही कलाकारांनी तर बेरोजगारीच्या संकटामुळे आत्महत्या केली आहे. कोरोनाच्या या संकटामुळे घर कसे चालवायचे असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे. कोरोनाच्या या स्थितीमुळे आपल्या करियरबाबात तारक मेहता का उल्टा चष्मा मधील नट्टू काका म्हणजेच घनश्याम नायक यांना देखील टेन्शन आले असल्याच्या बातम्या मीडियात आल्या होत्या. पण या बातम्या चुकीच्या असल्याचे घनश्याम यांनी स्वतः सांगितले आहे.

घनश्याम यांनी मुलाखतीत सांगितले आहे की, अशा नकारात्मक बातम्या कोण पसरवत आहेत हेच मला कळत नाहीये. सध्या सगळ्यांची परिस्थिती अतिशय वाईट आहे. कोरोनाच्या परिस्थितीत वृद्ध लोकांना महाराष्ट्राच्या बाहेर चित्रीकरणासाठी घेऊन जाणे शक्य नाहीये. निर्मात्यांनी आमच्यासाठी घेतलेला निर्णय योग्यच आहे. पण माझ्याबाबतीत ज्या बातम्या पसरवल्या गेल्या आहेत त्या चुकीच्या आहेत. मी कोणत्याही आर्थिक संकटात नाहीये. मी घरात सध्या कुटुंबासोबत खूप चांगला वेळ घालवत आहे. माझी मुलं गरजूंना मदत करत आहेत.

घनश्याम नायक गेली अनेक वर्षं मालिका आणि चित्रपटांमध्ये काम करत आहेत. त्यांची तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका प्रेक्षकांची चांगलीच आवडती आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. कोणत्याही कॉमेडी मालिकेने प्रेक्षकांचे इतके वर्षं मनोरंजन करण्याची ही पहिलीच वेळ आहे. या मालिकेतील जेठा, दया, माधवी भिडे, आत्माराम भिडे, रोशनसिंग सोठी, अय्यर, बबिता, कोमल, पोपटलाल या सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत.

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍मा