Join us

स्वप्निल सोनालीची धमाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2016 02:50 IST

                        मितवा मधील हिट जोडी म्हणजेच आपला चॉकलेट बॉय स्वप्निल जोशी ...

                        मितवा मधील हिट जोडी म्हणजेच आपला चॉकलेट बॉय स्वप्निल जोशी अन पोश्टर गर्ल सोनाली कुलकर्णी या दोघांनी खुप धमाल केली म्हणे. सोशल साईटवर सोनालीने दोघांचाही एक फोटो अपलोड केला असुन ती म्हणतेय, आम्ही पुन्हा एकत्र आलोय आणि या वेळेस एकदम डिफरंट लुकमध्ये आहोत. आता हे दोघे कोणत्या चित्रपटासाठी नाही तर एका कार्यक्रमादरम्यान पुन्हा भेटले अन त्यांनी मस्त एंजॉयमेंट केली. यावेळी स्वप्निल ब्लॅक कलरच्या शर्ट मध्ये खुपच हॅन्डसम दिसत होता तर सोनाली टोटली डिफरंट लुकमध्ये म्हणजेच एकदम शॉर्ट हेअरमध्ये दिसत होती.ब्लु अन व्हाईट कलरचा ड्रेस सोनालीने वेअर केला असुन हटके लुकमध्ये सध्या ती पहायला मिळत आहे. सोनालीच्या या कमेंटवर स्वप्निल म्हणतोय वॉट अ फन. आता ही जोडी मोठ्या पडद्यावर फन करताना त्यांच्या चाहत्यांना कधी दिसेल याच प्रतिक्षेत दोघांचेही फॅन्स असतील यात शंका नाही.