Join us

'शनी'कडून 'स्वामीं'ची बोलती बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2016 16:40 IST

शनीचं नाव ऐकून अनेकांची बोलती बंद होते. शनीला सारेच घाबरतात. बिग बॉसच्या दहाव्या सीझनमध्येही असाच काहीसा प्रकार पाहायला मिळाला. ...

शनीचं नाव ऐकून अनेकांची बोलती बंद होते. शनीला सारेच घाबरतात. बिग बॉसच्या दहाव्या सीझनमध्येही असाच काहीसा प्रकार पाहायला मिळाला. शनीने भल्या भल्यांची बोलती बंद केली आहे. असाच प्रकार बिग बॉसमध्ये घडला आहे. शनीने बिग बॉसच्या घरातील एका सदस्याची बोलतीच बंद केली. स्वतः किती श्रेष्ठ आहोत असा कायम दावा करणा-या बिग बॉसच्या घरातील बोलबच्चन स्वामी ओम यांची शनीने जणू काही बोलतीच बंद केली. त्याचं झाले असे की कर्मफल दाता शनी मालिकेत शनीदेवाची भूमिका साकारणारा अभिनेता कार्तिकेय मालवीय या मालिकेच्या प्रमोशनसाठी बिग बॉसच्या घरात पोहचला. यावेळी शनीने बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांना घरात कसे वागावे याबाबत सल्ला दिला. नेहमीप्रमाणे बोलबच्चन देणारे आणि शेखी मिरवणा-या स्वामी ओम शनीला म्हणजेच कार्तिकेय पाहिल्यावर स्वतःला रोखू शकले नाहीत. इतरांप्रमाणे स्वामीजीसुद्धा शनीला शुभेच्छा देण्यासाठी गेले. मात्र शनीने त्यांना रोखले. शनीचा हा अवतार पाहून स्वामी ओम अवाक झाले आणि त्यांची बोलतीच बंद झाली. स्वामी ओम यांच्या या वागण्यावर घरातल्या इतर सदस्यांनीही त्यांना खडे बोल सुनावले.