Join us

​सुनील शेट्टी सांगतोय त्याच्या फिटनेसचे रहस्य

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2017 6:03 AM

सुनील शेट्टी सध्या इंडियाज असली चॅम्पियन... है दम या कार्यक्रमात सूत्रसंचालकाची भूमिका बजावत आहे. त्याने अनेक वर्षांपूर्वी बिगेस्ट लुझर ...

सुनील शेट्टी सध्या इंडियाज असली चॅम्पियन... है दम या कार्यक्रमात सूत्रसंचालकाची भूमिका बजावत आहे. त्याने अनेक वर्षांपूर्वी बिगेस्ट लुझर जितेगा या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले होते. आता तो पुन्हा अनेक वर्षांनंतर छोट्या पडद्यावर परतला आहे. सुनील शेट्टी आज 56 वर्षांचा असला तरी तो अतिशय फिट आहे. तो त्याच्या फिटनेसचे सगळे श्रेय हे योगाला देतो. योगामुळे शारीरिक व्यायाम होतो. पण त्याचसोबत मानसिक समाधानदेखील मिळत असे त्याचे म्हणणे आहे. याविषयी तो सांगतो, माझा योगावर प्रचंड विश्वास आहे. मी न चुकता रोज योगा करतो. प्राणायाम या योगाच्या साध्यासुध्या प्रकारानेदेखील तुम्हाला वेगळे जीवन जगण्यामध्ये मदत होते. मला पूर्वी वारंवार मायग्रेनचा त्रास होत असे. किती डॉक्टर केले तरी त्यावर काहीही गुण येत नव्हता. त्यामुळे मला काही जणांना योगा करण्याचे सुचवले आणि योगा करायला सुरुवात केल्यानंतर माझे जीवन पूर्णपणे बदलले. म्हणून योगा हा कोणत्याही आजारावरील उपचार आहे असे मला वाटते. मानसिकरित्या आणि शारीरिकरित्या आरोग्यदायी असणे हे गरजेचे आहे. मला तर वाटते व्यायामशाळेत वगैरे जाण्याची काहीही गरज नाही. चालणे, धावणे, सायकल चालवणे हे सगळेच अतिशय चांगले व्यायाम आहेत. मी माझ्या फिटनेसच्याबाबतीत सतर्क आहे. मी नेहमीच पाऱ्यांचा वापर करतो. तसेच शक्य तितका चालण्याचा प्रयत्न करतो. तसेच मी कोणत्याही मादक पदार्थांचे सेवन करत नाही. ज्यामुळे मला आरोग्य राखण्यात खूप मदत होते. मी कोणत्याही प्रकारचे प्रोटिन शेक्स, स्टिरॉईट अथवा सप्लिमेंट्स घेत नाही. तसेच मी खाण्याबद्दलदेखील खूप सतर्क असतो. मी फक्त घरात बनवलेल्या पदार्थांचेच सेवन करतो. मी बाहेरचे खाणे टाळतो. यामुळेच मी फिट असून माझ्या इंडियाज असली चॅम्पियन... है दम या कार्यक्रमातील स्पर्धकांनादेखील फिटनेसचे धडे देणार आहे.