Join us  

'राधाकृष्ण'च्या सेटवर सुमेध मुदगलकर या गोष्टीला करतोय सगळ्यात जास्त मिस !

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2018 6:30 AM

‘राधाकृष्ण’ या मालिकेत कृष्णाची भूमिका साकारणारा सुमेध आपली भूमिका जास्तीत जास्त परिपूर्ण आणि अचूक साकारावी यासाठी यासाठी तब्बल 20 वेळा शॉट दित असतो.

कृष्णाच्या भूमिकेद्वारे वाढती लोकप्रियता मिळविणारा अभिनेता सुमेध मुदगलकर आपली भूमिका अधिकाधिक उत्तम व्हावी, यासाठी सतत प्रयत्नशील असतो. ‘राधाकृष्ण’ या मालिकेत कृष्णाची भूमिका साकारणारा सुमेध आपली भूमिका जास्तीत जास्त परिपूर्ण आणि अचूक साकारावी यासाठी यासाठी तब्बल 20 वेळा शॉट दित असतो.

विशेष म्हणजे या मालिकेचा सेट हा मुंबईत नसून उंबरगाव येथे आहे. त्यामुळे कलाकारांना सततच्या शेड्युअलमुळे उंबरगाव येथे चित्रीकरण करता आणि तिथेच राहतात. मात्र,राधाकृष्णच्या सेटवर सुमेध मुदगलकर महाराष्ट्रीय पदार्थ मिस करत आहे. तो म्हणतो, तो महाराष्ट्रीय चव अगदी मिस करत असून त्याने आपल्या आईबाबांना सेटवर घरचे जेवण पाठवण्याचा प्रबंध करायला सांगितले आहे कारण त्याच्या व्यस्त वेळापत्रकामधून बाहेर पडून घरी जाणे त्याच्यासाठी खूपच कठीण आहे.

सुमेध म्हणाला, “मला घरची मिसळ पाव, पुरणपोळी आणि माझ्या आईने बनवलेले पदार्थ खायची खूप इच्छा होत होती. इथे अनेक पदार्थ आहेत पण ती चव नव्हती. मला एक छोटीशी सुट्टी हवी आहे जेव्हा मी चविष्ट महाराष्ट्रीय पदार्थांवर ताव मारू शकेन.” अल्पावधीत श्रीकृष्ण बनत रसिकांच्या पसंती मिळवल्यानंतर तो आणखीन एका रोमँटीक अल्बमधूनही रसिकांच्या भेटीला येणार आहे.‘बेखबर कशी तू’ असे या अल्बममचे नाव असून संस्कृती बालगुडेसह तो अल्बमध्ये दिसणार आहे.केश आणि सोनीपतच्या निसर्गरम्य ठिकाणी ह्या म्युझिक अल्बमचे चित्रीकरण झाले आहे. 

टॅग्स :सुमेध मुदगलकर