Join us  

रिद्धीमा तिवारी 'दिव्य दृष्टी' मालिकेसाठी करतेय 'ही' गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2019 7:15 AM

स्टार प्लस वाहिनीवरील 'दिव्य दृष्टी' या नव्या मालिकेने प्रेक्षकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे.

मन गुंतवून ठेवणारी कथा आणि कलाकारांचा दर्जेदार अभिनय यामुळे स्टार प्लस वाहिनीवरील 'दिव्य दृष्टी' या नव्या मालिकेने प्रेक्षकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. आता मालिकेत ओजस्विनी शेरगिलची भूमिका रंगविणारी अभिनेत्री रिद्धीमा तिवारीने आपल्या संवादांमध्ये स्वत:ची भर टाकून त्यांना एक वेगळाच अर्थ प्राप्त करून दिला आहे.

रिद्धीमा म्हणाली, “माझ्या दृष्टीने या मालिकेची कथा व संकल्पना अगदी उत्कंठावर्धक वैशिष्ट्यपूर्ण असल्यानेच मला या मालिकेत भूमिका साकारण्याची खूप इच्छा होती. त्यामुळे मालिकेच्या निर्मात्यांनी जेव्हा या भूमिकेसाठी मला ऑफर दिली, तेव्हा मला खूप आनंद झाला. यातील ओजस्विनीच्या व्यक्तिरेखेचे माझ्या स्वत:च्या स्वभावाशी खूपच साम्य आहे, असे मला वाटते. ओजस्विनीच्या संवादांमध्ये मी स्वत:च्या संवादाचीही थोडीशी भर घालते. त्याद्वारे ही व्यक्तिरेखा मी आणखीन चांगली करण्याचा प्रयत्न करते आहे.”

रिद्धीमा आपल्या संवादांसाठी घेत असलेल्या पुढाकारामुळे मालिकेतील खमंगपणा वाढविताना पाहणे कमालीचे ठरणार आहे. मालिकेच्या कथानकात नकारात्मक आणि विनोदी भावनांची सरमिसळ झाल्याने ही मालिका प्रेक्षणीय होत आहे.

टॅग्स :दिव्य दृष्टीस्टार प्लस