Join us  

टीव्हीच्या लाडक्या कलाकारांनी शेअर केल्या त्यांच्या खास आठवणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2018 5:42 AM

दरवर्षी आपण मातृत्वाचा सन्मान करण्यासाठी आणि या भावनेला वंदन करण्यासाठी एक दिवस साजरा करतो. एक पालक किंवा गृहिणी यापलिकडे ...

दरवर्षी आपण मातृत्वाचा सन्मान करण्यासाठी आणि या भावनेला वंदन करण्यासाठी एक दिवस साजरा करतो. एक पालक किंवा गृहिणी यापलिकडे जाऊन मेहनत घेणाऱ्या स्त्रीच्या परीश्रमांचे कौतुक करण्याची ही एक संधी असते.  शिक्षक, मार्गदर्शक, मेंटॉर अशा अनेक भूमिका बजावत आई आपल्याला प्रेरणा देते, ती जगातील सगळ्यात मोठा पाठिंबा बनते. मदर्स डेच्या या खास प्रसंगी आम्ही &TV वरील आमच्या काही आघाडीच्या कलाकारांना आईचे त्यांच्या आयुष्यातील स्थान काय आहे, यासंदर्भातील मते विचारली.शुभांगी अत्रे म्हणजेच 'भाभीजी घर पर है'ची अंगुरी भाभी म्हणाली, "मला वाटते मदर्स डे रोजच साजरा होतो.प्रत्येकाच्या आयुष्यात आई हीच पहिला गुरु असते आणि मोठे असताना आयुष्याचे सगळे धडे तीच आपल्याला पहिल्यांदा शिकवते.एक मैत्रिण, मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान म्हणून आईने मला नेहमीच एक सल्ला दिला... प्रत्येक काम पूर्ण झोकून देऊन आणि प्रामाणिकपणे करायला हवे. मी आजही याचे पालन करते. इतकेच नाही, माझ्या पालकांनी नेहमीच माझ्या स्वप्नांना पाठिंबा दिला. मदर्स डेच्या या खास प्रसंगी मी प्रत्येक आईला वंदन करते आणि त्यांना मदर्स डेच्या शुभेच्छा देते! इतरांना मी सांगू इच्छिते की आईने ज्याप्रमाणे तुमच्यावर निरपेक्ष प्रेम केले तसेच तुम्ही तिच्यावर करू शकता... अगदी दररोज."'मेरी हानिकारक बिवी'मधील निरजा म्हणजेच सत्यानी घोष म्हणाली, "गेली अनेक वर्षे माझ्यासाठी हा दिवस म्हणजे वर्षभरच आई आणि मुलीमधील बंध साजरा करणे, एक दिवस तिच्यासाठी काही करण्याऐवजी दरररोज काहीतरी खास करणे.माझी आई म्हणजे माझी पहिली मैत्रिण आणि इतर प्रत्येक आईप्रमाणे तिनेही मला बरेच काही शिकवले आहे. लहानपणापासून तिने मला सांगितले की आपण शक्य तेवढे, विशेषत: आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असायला हवे. हे मी पक्के लक्षात ठेवले आहे आणि मला वाटते यामुळे माझे आताचे व्यक्तिमत्त्व साकारले गेले आहे. एक मुलगी म्हणून अशी व्यक्ती आपली आई असणे हे माझे सुदैव मानते. हे थोडे पुस्तकी वाटेल पण मला खरेच वाटते की 'देव सगळीकडे नसू शकतो म्हणून त्याने आई बनवली.' प्रत्येक आई आणि मुलीला हे बंध साजरे करण्याची, शक्य त्या सर्व पद्धतीने याची मजा घेण्याची विनंती मी करते. सगळ्यांना माझ्यातर्फे हॅप्पी मदर्स डे!"'बिट्टी बिझनेसवाली'मधील बिट्टी म्हणजेच प्रकृती मिश्रा म्हणाली, "माझ्यासाठी प्रत्येक दिवस मदर्स डे आहे! माझे आईसोबत खूप घट्ट नाते नाहे आणि मला ती माझी अगदी जवळची मैत्रिणच वाटते. आयुष्यात ती सर्वात मोठे प्रेरणास्थान आणि पाठिंबा आहे. अशी कुल आणि समजूतदार आई असणं, हे माझं भाग्यच आहे. कलाकार म्हणून कितीही प्रसिद्धी मिळाली तरी आपण नेहमीच नम्र असायला हवं, कोणताही गर्व बाळगता कामा नये, हे तिने मला सतत सांगितलं आहे. सर्व मुलींच्या वतीने मी सर्व आयांचे आमच्यासोबत असल्याबद्दल आणि आमच्यावर निरपेक्ष प्रेम केल्याबद्दल मी आभार मानते."'सिद्धीविनायक'मधील विनायक म्हणजे नितीन गोस्वामी म्हणाला, "मी लहान असल्यापासून मला आई सांगायची की स्वप्नांचा ध्यास ठेव आणि हे करिअर निवडतानाही तिने मला पाठिंबा दिला. आपण जे काही करू त्यात आपल्याला समाधान मिळायला हवं, असं तिला वाटतं. आपल्या शक्य होईल तितकी मदत इतरांना नेहमी करावी आणि इतरांच्या दु:खाचे कारण बनू नये, हा मोलाचा सल्ला तिने मला दिला. मी तिच्याकडून ही गोष्ट शिकलो. मदर्स डेच्या या खास प्रसंगी इतकंच सांगू इच्छितो की आपल्या मुलांवर नेहमी प्रेम करा आणि त्यांना पाठिंबा द्या. जेव्हा एखादी आई आपल्या मुलाला सांगते की तू हे करू शकतोस आणि यश मिळवू शकतोस, तेव्हा तो आशीर्वादच असतो आणि ती जे काही बोलते त्याचा मुलांच्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम होत असतो."'श्रीकृष्णा'मधील नंद बाबा म्हणजेच सचिन श्रॉफ म्हणाला, "लहान असताना एका मदर्स डेला मी आईला कार्डबोर्ड आणि मार्बल पेपरने बनवलेलं घर दिलं होतं आणि पुढे आपण तिला असंच सुंदर घर प्रत्यक्षात देऊ, असाही विचार केला होता. मी नेहमीच तिच्या जवळ होतो आणि मला वाटतं आज मी जे काही यश मिळवलंय ते तिच्या आशीर्वाद आणि प्रार्थनांचे फळ आहे. तिने नेहमीच मला पाठिंबा दिला आणि मला नेहमी नम्र, निर्गर्वी राहण्याचा सल्ला दिला. मेहनत करायची, वाट पहायची आणि देवावरचा विश्वास ढळू द्यायचा नाही, हे तिने मला शिकवलं. या मदर्स डेनिमित्त मी सर्व आयांना सांगू इच्छितो की असेच आमच्यावर प्रेम करत रहा आणि आमच्यासाठी प्रार्थना करत रहा."'बिट्टी बिझनेसवाली'मधील माही म्हणजेच अभिषेक बजाज म्हणाला, "मदर्स डेची एक आठवण म्हणजे आईवडिलांना कावडीतून घेऊन जाणाऱ्या श्रावण बाळाचे चित्र. मी हे चित्र काढून माझ्या आईला दिले होते. ती माझ्यासाठी काय आहे, हे तिला कळावे, असे मला वाटत होते. ती माझ्यासाठी नेहमीच प्रेरणास्थान आहे. नम्र आणि शांत राहण्यास तिने मला शिकवलं आणि हे गुण आयुष्यात फार मोलाचे ठरले आहेत. या मदर्स डेनिमित्त मी सर्व आयांना सांगू इच्छितो की तुम्ही मुलांसाठीच नाही तर पूर्ण कुटुंबासाठी फार अनमोल आहात. माझ्या ज्या चाहत्या आया आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की कृपया बिट्टी बिझनेसवाली पहा. कारण,या व्यक्तिरेखेशी तुम्ही स्वत:ला जोडून घेऊ शकाल आणि तुमचे मनोरंजनही होईल.