डान्स प्लस 2 या कार्यक्रमाच्या सेटवर नुकतीच सोनाक्षी सिन्हा तिच्या अकिरा या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गेली होती. या कार्यक्रमातील स्पर्धकांची नृत्ये पाहून ती थक्कच झाली. तिने काही स्पर्धकांसोबत गंदी बात, चिंता ता चिता चिता या तिच्या गाण्यांवर ताल धरला. या कार्यक्रमातील स्पर्धकांचे नृत्य पाहून माझी आई येथे असती तर तिने खूपच एन्जॉय केला असता असे सोनाक्षी म्हणाली. राघव जुयालचा स्लो मोशन डान्स सगळ्यांनाच आवडतो, मीदेखील त्याच्या या नृत्याची फॅन असल्याचे सोनाक्षीने सांगितले आणि तिने हे नृत्य त्याला सादर करायलादेखील लावले. सोनाक्षीने सांगताच जुयालनेदेखील लगेचच डान्स करून सगळ्यांचे मनोरंजन केले. तसेच रेमो डिसोझासोबतही सोनाक्षीने नृत्य सादर केले.
सोनाक्षीने केली नृत्याची फर्माईश
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2016 13:47 IST