Join us  

लवकरच अजिंक्य आणि शीतलचा शुभविवाह

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2018 11:18 AM

'लाखात एक माझा फौजी' असं म्हणत प्रेक्षकांच्या मनात घर केलेल्या झी मराठी वाहिनीवरील 'लगीरं झालं जी' या लोकप्रिय मालिकेने नुकताच ...

'लाखात एक माझा फौजी' असं म्हणत प्रेक्षकांच्या मनात घर केलेल्या झी मराठी वाहिनीवरील 'लगीरं झालं जी' या लोकप्रिय मालिकेने नुकताच ३०० भागांचा टप्पा गाठला. प्रेक्षकांच्या अखंड प्रेमामुळे ही मालिका हे यश आणि टीआरपीचे उच्चांक गाठू शकली. शीतली आणि अज्याची प्रेमकथा प्रेक्षकांनाही भावात आहे तशीच ती आपलीशी देखील वाटत आहे. शीतल आणि अजिंक्यच्या प्रेमाला अनेकांचा विरोध होता पण तो विरोध न जुमानता त्यांच्या प्रेमावरील दृढ विश्वासामुळे ते दोघे लवकरच एकत्र येणार आहेत. लग्नाची बोलणी झाल्यानंतर अजिंक्य आणि शीतलच्या लग्नाचा मुहूर्त ३० मे चा निघाला आहे.दोघांच्याही घरी लग्नाची गडबड सुरु आहे. अशा परिस्थितीत जयश्री अचानकपणे लग्न करुन येते आणि घरच्यांना आश्चर्याच्या धक्का देते. तिच्या अशा अचानक घेतलेल्या निर्णयामुळे घरात वादविवाद होतात. पण अजिंक्य शीतलचं लग्न ठरल्यावेळी करायचं ठरतं. पण त्यांचं लग्न होऊ नये यासाठी हर्षवर्धन खूप अतोनात प्रयत्न करतोय. त्यांच्या लग्नात अडथळा आणण्यासाठी हर्षवर्धन शीतलच्या घरात आर्थिक संकटं आणतो. ज्यामुळे अजिंक्य आणि शीतल शेवटी सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न करायचा निर्णय घेतात आणि घरच्यांची त्यासाठी परवानगी मिळवतात. अजिंक्य आणि शीतलचा हा विवाह सोहळा आणि लगीनघाईतील मजा मस्ती प्रेक्षक येत्या भागात पाहू शकणार आहेत. या मालिकेत शीतलची भूमिका अभिनेत्री शिवानी बावकर ही साकारते आहे.शिवानी ही केवळ २५ वर्षांची असली तरी तिची कमाई ही खूपच जास्त आहे. शिवानी एका दिवसात किती रुपये कमवते हे ऐकले तर तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल. लागीरं झालं जी या मालिकेच्या चित्रीकरणासाठी केवळ एका दिवसाचे ती २०-२५ हजार रुपये घेत असल्याची जोरदार चर्चा आहे. हा आकडा कोणीही अधिकृत रित्या सांगितलेला नाहीये तर हा इंटरनेटवर उपलब्ध आहे. त्यामुळे शिवानी दिवसांची कमाई खरंच इतकी आहे का हे केवळ तीच आपल्याला सांगू शकते.