परितोष पेंटरला मालिकेचा एक भाग लिहिण्यासाठी श्री अधिकारी ब्रदर्स देणार तब्बल इतके लाख
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2017 14:29 IST
श्री अधिकारी ब्रदर्सने आतापर्यंत अनेक प्रसिद्ध मालिका छोट्या पडद्याला दिलेल्या आहेत. त्यांच्या कॉमेडी मालिका नेहमीच हिट होतात. एवढेच नव्हे ...
परितोष पेंटरला मालिकेचा एक भाग लिहिण्यासाठी श्री अधिकारी ब्रदर्स देणार तब्बल इतके लाख
श्री अधिकारी ब्रदर्सने आतापर्यंत अनेक प्रसिद्ध मालिका छोट्या पडद्याला दिलेल्या आहेत. त्यांच्या कॉमेडी मालिका नेहमीच हिट होतात. एवढेच नव्हे तर त्याने अनेक हिट चित्रपटांचीदेखील निर्मिती केली आहे. हे प्रोडक्शन हाऊस लवकरच एक नवी वाहिनी घेऊन येत आहे. या वाहिनीचे नाव हॅपी असून या वाहिनीवर केवळ कॉमेडी कार्यक्रम पाहायला मिळणार आहेत. इंडस्ट्रीतील कॉमेडीशी निगडित असलेल्या चांगल्या कलाकारांचा, लेखक आणि दिग्दर्शकांचा आपल्या वाहिनीत समावेश करावा यासाठी ते सध्या प्रयत्न करत आहेत आणि त्यासाठी त्यांना तगडे मानधनदेखील देत आहेत.परितोष पेंटरने धमाल, पेईंग गेस्ट, ऑल द बेस्ट असे कॉमेडी चित्रपट लिहिले असून त्याने अनेक नाटकांचे दिग्दर्शनदेखील केले आहे. परितोषने एक अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. परितोषला श्री अधिकारी ब्रदर्सने त्यांच्या या नवीन वाहिनीवरील मालिका लिहिण्यासाठी करारबद्ध केले असून त्यासाठी त्याला प्रत्येक भागाचे साडे सात लाख रूपये दिले जाणार असल्याचे म्हटले जात आहे. कोणत्याही कॉमेडी मालिकेचे संपूर्ण टीमचे मिळून एका भागाचे इतके बजेट असते. पण चांगले कार्यक्रम लोकांच्या भेटीस यावेत म्हणून इतके बजेट केवळ लेखकासाठी वेगळे ठेवण्यात आलेले आहे. परितोष श्री अधिकारी ब्रदर्ससाठी मालिका लिहित असल्याचे त्याने कबूल केले असले तरी त्याने पैशांबाबत काहीही सांगण्यास नकार दिला. परितोष सध्या या कॉमेडी मालिका लिहिण्यासोबतच पोस्टर बॉईज आणि टोटल धमाल या चित्रपटांमध्ये व्यग्र आहे. पोस्टर बॉईज या त्याने लिहिलेल्या चित्रपटाचे तर चित्रीकरणदेखील संपलेले आहे.