Join us  

स्नेहा वाघने शेअर केला सेटवरचा क्यूट फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2019 7:15 AM

चंद्रगुप्त मौर्यच्या आईची म्हणजे मुराची भूमिका करणाऱ्या स्नेहा वाघने नुकताच तिच्या मैत्रिणीकडे असणाऱ्या रॉन नावाच्या एका क्युट पिल्लाबरोबर काढलेला फोटो शेअर केला

ठळक मुद्देस्नेहा ही चंद्रगुप्त मौर्यची आई आणि पिपलीवनची माजी राणी असलेल्या मुराची भूमिका करते

सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवरील ऐतिहासिक कार्यक्रम असलेल्या चंद्रगुप्त मौर्य मालिकेत ह्या मौर्याने राजाच्या आयुष्यातील काही रोचक प्रसंग दाखवले जातात. ह्या मालिकेत इंडस्ट्रीमधील काही प्रतिभावान कलाकार आहेत आणि त्यातील नाट्यमय वळणांमुळे प्रेक्षक टिव्हीसमोरून उठत नाहीत. चंद्रगुप्त मौर्यच्या आईची म्हणजे मुराची भूमिका करणाऱ्या स्नेहा वाघने नुकताच तिच्या मैत्रिणीकडे असणाऱ्या रॉन नावाच्या एका क्युट पिल्लाबरोबर काढलेला फोटो शेअर केला. त्या पिल्लाला बघून ती एवढी हरवून गेली की सेटवरच्या लोकांना तिचं एक नवीनच रूप बघायला मिळालं. 

स्नेहा ही चंद्रगुप्त मौर्यची आई आणि पिपलीवनची माजी राणी असलेल्या मुराची भूमिका करते. तिला हा सेटवरील नवीन मित्र खूपच आवडला. सामान्यपणे कुत्रे हा अनेक मुलींचा विकनेस असतो पण जर कुत्र्यामुळे तुम्ही जिवंत असल्याची भावना निर्माण होत असेल तर टी नक्कीच काहीतरी खास आहे. ती म्हणते, "मला लहानपणी पाळीव प्राणी खूप आवडायचे आणि एके दिवशी आम्ही आमच्या घरी एक कुत्रा आणला. तीन दिवसांनंतर माझ्या आईने तो कुत्रा परत द्यायला सांगितलं. मेळा तसं करायचं नव्हतं आणि म्हणून मी एक आठवडा रडत होते. पण दुर्दैवाने आईने मला त्याला घरी ठेवण्याची परवानगी दिली नाही. मी स्वतःला पाळीव प्राण्यांपासून लांब ठेवण्याचं ठरवलं होतं. पण जेव्हा मी रॉनला बघितलं तेव्हा सगळ्यांना माझं दुसरंच रूप दिसलं. त्या लहानश्या क्युट पिल्लाबरोबर मी खेळायला लागले आणि मला समजलं की अशा प्राण्यांपासून लांब राहणं खरंच खूप अवघड आहे. मला सेटवर हा एक नवीन मित्र मिळाला आहे त्याच्याबरोबर मी कुठेही खेळू शकते."

टॅग्स :स्रेहा वाघसोनी सब