Join us

​रेशम टिपणीस आणि राजेश शृंगारपूरे यांच्या नात्याबाबत अखेर त्याच्या पत्नीने सोडले मौन...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2018 10:45 IST

बिग बॉस मराठीमधील रेशम टिपणीस आणि राजेश शृंगारपूरे यांच्यात मैत्रीपेक्षा अधिक काहीतरी असल्याचे प्रेक्षकांना बिग बॉसच्या घरात पाहायला मिळाले ...

बिग बॉस मराठीमधील रेशम टिपणीस आणि राजेश शृंगारपूरे यांच्यात मैत्रीपेक्षा अधिक काहीतरी असल्याचे प्रेक्षकांना बिग बॉसच्या घरात पाहायला मिळाले होते. बिग बॉसच्या घरात असताना ते दोघे जास्तीत जास्त वेळ एकमेकांसोबतच घालवत असत. एवढेच नव्हे तर ते एकाच बेडमध्ये झोपत होते. या सगळ्या कारणामुळे प्रेक्षक प्रचंड चिडले होते. बिग बॉस हा कार्यक्रम अनेकजण आपल्या कुटुंबियांसोबत पाहातात. त्यामुळे त्यात अशा अश्लील गोष्टी दाखवणे चुकीचे असल्याचे प्रेक्षकांचे म्हणणे होते. या कारणामुळे बिग बॉस मराठीच्या विरोधात तक्रार देखील दाखल करण्यात आली होती. एवढेच नव्हे तर बिग बॉस मराठीचे सूत्रसंचालक महेश मांजरेकर यांनी देखील रेशम आणि राजेशची त्यांच्या वागण्याबद्दल चांगलीच खरडपट्टी काढली होती. आता राजेशला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडावे लागले आहे. राजेश बाहेर गेल्यामुळे रेशम आता एकटी पडली आहे. राजेश घराच्या बाहेर पडल्यानंतर आता त्याच्या पत्नीची या प्रकरणाविषयी प्रतिक्रिया काय असणार याची सगळ्यांना उत्सुकता लागली होती. राजेश आणि रेशमच्या प्रकरणामुळे राजेशची पत्नी डिंपलने तिच्या दोन्ही मुलींसोबत घर सोडले असून ती सध्या तिच्या मोठ्या बहिणीसोबत राहात असल्याची चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू आहे. पण या सगळ्यावर राजेशच्या पत्नीने मौन बाळगणेच पसंत केले होते. पण आता तिने एका वर्तमानपत्राशी बोलताना सांगितले आहे की, मी राजेशसोबत त्याच्याच घरात राहात आहे. आमच्या दोघांचा संसार अगदी चांगल्या प्रकारे सुरू आहे. मी राजेशसोबत आणि माझ्या मुलींसोबत खूपच खूश आहे आणि मी घर सोडून गेली असल्याच्या गेल्या काही दिवसांपासून ज्या चर्चा सुरू आहेत, त्या पूर्णपणे चुकीच्या आहेत. मला सख्खी बहीण नाही. त्यामुळे मी घर सोडून बहिणीकडे राहण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. राजेश बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यावर त्याची पत्नी काय प्रतिक्रिया देते याकडे सगळ्याच लोकांचे लक्ष लागले होते. पण त्या दोघांमध्ये सगळे आलबेल आहे हे सांगत डिंपलने या संपूर्ण प्रकरणावर पडदा टाकलेला आहे. Also Read : बिग बॉस मराठीमध्ये रेशम टिपणीससोबत असलेल्या नात्यामुळे चर्चेत आलेला राजेश शृंगारपुरे आहे विवाहित, जाणून घ्या त्याच्या कुटुंबियांविषयी